ज्याची भीती तेच घडल… युक्रेनवर अत्यंत मोठा हल्ला, भयंकर विनाश, तब्बल इतक्या लोकांचा मृत्यू..
रशिया आणि युक्रेन युद्ध पेटल्याचे बघायला मिळत आहे. पुतिन यांच्या घराला टार्गेट करत मोठा हल्ला युक्रेनने केला. रशियाच्या लष्कराने तो उधळून लावला. मात्र, आता रशिया थेट पणे युक्रेनच्या विरोधात मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे. अमेरिकेकडून शांतता प्रस्ताव दोन्ही देशांना देण्यात आला. मात्र, अमेरिकेच्या शांतता प्रस्तावाला युक्रेनने केराची टोपली दाखवली. अमेरिकेकडून नवीन शांतता प्रस्ताव तयार केला जात असतानाच युक्रेनने थेट मोठा हल्ला करण्याचा कट रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या घरावर करण्याचा रचला. हैराण करणारे काही व्हिडीओ पुढे आली. अमेरिकेने देखील या हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला. पुतिन यांच्या घरावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आणि युक्रेनच्या एका चुकीमुळे जग संकटात सापडल्याचे बोलते जातंय. हेच नाही तर पुतिन यांच्या घराला टार्गेट करण्यात आल्यानंतर रशियन लष्कराने याची अत्यंत वाईट किंमत किवा मोजावी लागेल, हे स्पष्ट केले.
पुतिन यांची झोपेतच हत्या करण्याचा नियोजित कट युक्रेनने रचल्याचा दावा रशियाने केला. आता रशियाला युक्रेनने सळो की पळो करून सोडणार हे संपूर्ण जगाला माहिती होते. त्यामध्येच अत्यंत मोठा हल्ला रशियाने युक्रेनवर केला. ज्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला. रशियाने युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणला. खेरसन प्रदेशातील खोरली येथील एका कॅफे आणि हॉटेलवर ड्रोन हल्ला केला. रशियाने केलेल्या या हल्ल्यात 28 लोकांचा जीव गेला.
गव्हर्नर व्लादिमीर साल्डो यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात तीन लोकांचा मृत्यू झाला मृतांचा आकडा 28 वर पोहोचला आहे. हल्ल्याच्या वेळी कॅफेमध्ये 100 हून अधिक लोक उपस्थित होते आणि 60 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर लगेचच बचावकार्य राबवण्यात आले. 31 लोकांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लोक नवीन वर्षाच्या स्वागतात व्यस्त असताना हा हल्ला करण्यात आला.
रशियाने केलेल्या या हल्ल्यात युक्रेनमध्ये मोठे नुकसान झाल्याचे माहिती मिळतंय. झेलेंस्की यांनी म्हटले की, खार्किववरील रशियाचा भीषण हल्ला त्याची क्रूरता दर्शवतो. दोन क्षेपणास्त्रे लोक राहतात, त्या भागात टाकली. इमारत गंभीरपणे उद्ध्वस्त झाली. मात्र, युक्रेनच्या या आरोपानंतर रशियाने म्हटले की, हा हल्ला आम्ही केलेला नाहीये. युक्रेन आमच्यावर खोटे आरोप करत असून या हल्ल्याचा आणि आमचा काहीही संबंध नाहीये.
