आशिया खंडात उडणार युद्धाचा भडका उडणार? दोन बलाढ्य देश आमने सामने, थेट जहाज…

China Japan Tension : आशियातील दोन प्रमुख देश असणाऱ्या चीन आणि जपान यांच्यात राजनैतिक वाद वाढत चालला आहे. जपानने चिनी मासेमारी जहाजावर कारवाई करत ते ताब्यात घेतले आहे.

आशिया खंडात उडणार युद्धाचा भडका उडणार? दोन बलाढ्य देश आमने सामने, थेट जहाज...
China Japan Tension
Image Credit source: Google
| Updated on: Feb 13, 2026 | 6:29 PM

गेल्या काही काळापासून जगात अस्थिरता निर्माण झालेली आहे. अनेक देशांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. अशातच आता आशियातील दोन प्रमुख देश असणाऱ्या चीन आणि जपान यांच्यात राजनैतिक वाद वाढत चालला आहे. आज जपानी अधिकाऱ्यांनी आपल्या आर्थिक क्षेत्रात (EEZ) बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या चिनी मासेमारी जहाजावर कारवाई करत ते ताब्यात घेतले आहे. तैवान मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये आधीच तणाव आहे, त्याच दरम्यान ही घटना घडली आहे. 2022 नंतर जपानने पहिल्यांदाच चिनी जहाजावर इतकी कठोर कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मध्यरात्री समुद्रात हाय-व्होल्टेज ड्रामा

जपानच्या मत्स्यव्यवसाय संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नागासाकीच्या नैऋत्य किनाऱ्यापासून सुमारे 170 किलोमीटर अंतरावर हे जहाज पकडण्यात आहे. जपानचे गस्त घालणारे जहाज हाकुओ मारूला संशयास्पद स्थितीत एक चिनी जहाज दिसले, त्यानंतर जपानी अधिकाऱ्यांनी हे जहाज थांबवण्याचे आदेश दिले. मात्र चिनी कॅप्टनने आदेशाकडे दुर्लक्ष करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जपानी अधिकाऱ्यांनी जहाजाचा पाठलाग केला आणि कॅप्टनसह जहाज ताब्यात घेतले. या जहाजावर 11 क्रू मेंबर्स होते.

कारवाई सुरूच राहणार – जपान

जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव मिनोरू किहारा यांनी या घटनेवर म्हटले की, ‘परदेशी जहाजांकडून होणारी बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी आम्ही आगामी काळातही अशीच कारवाई करत राहू.’ या कारवाईनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या क्रू सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करावे आणि कायद्यानुसार योग्य कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच चीनने याला द्विपक्षीय मत्स्यपालन करारांचे उल्लंघन असेही म्हटले म्हटले आहे.

तैवानच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव

तैवानच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमधील तणाव वाढलेला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये जपानचे पंतप्रधान साने ताकेची यांनी संसदेत सांगितले होते की, जर चीनने तैवानवर हल्ला केला तर जपान लष्करी हस्तक्षेप करू शकतो असं म्हटलं आहे. यानंतर चीननेही आक्रमक भूमिका घेत आपल्या नागरिकांना जपान न जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोन्ही देश एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.