AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर आता 7 जूनच्या मध्यरात्रीही पाकिस्तान हादरणार? पाक सरकार अलर्ट मोडवर

महिन्याच्या सात तारखेला येणारं संकट काही केल्या पाकिस्तानची पाठ सोडायला तयार नाही, 7 मे 2025 च्या रात्री भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. आता पुन्हा एकदा एक नवं सकंट पाकिस्तावर येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर आता 7 जूनच्या मध्यरात्रीही पाकिस्तान हादरणार? पाक सरकार अलर्ट मोडवर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 05, 2025 | 2:35 PM
Share

महिन्याच्या सात तारखेला येणारं संकट काही केल्या पाकिस्तानची पाठ सोडायला तयार नाही, 7 मे 2025 च्या रात्री भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, तसेच 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. आता पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाली आहे की, सात जूनला पाकिस्तानमध्ये काहीतरी मोठं घडणार आहे, या संदर्भातील भाकीत पाकिस्तानी एक्सपर्टकडून वर्तवण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या कराची शहराला गेल्या 72 तासांमध्ये भूकंपाचे तब्बल 27 धक्के बसले आहेत. याचदरम्यान पाकिस्तानच्या भूकंप न्यूज आणि रिसर्च सेंटरचे सीईओ शाहबाज लघारी यांनी मोठं भाकीत केलं आहे. सात जूनला कराचीमध्ये रात्री मोठा भूकंप येऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. लघारी यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार हा भूकंप खूप शक्तिशाली असू शकतो, ज्यामुळे कारचीचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. या पार्श्वभूमीवर कराचीमधील नागरिकांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लघारी यांनी नेमकं काय म्हटलं?

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार लघारी यांनी असा दावा केला आहे की, ज्या प्रकारे सध्या कराची शहराला छोटे-छोटे भूकंपाचे धक्के बसत आहेत, ते पाहाता शुक्रवारी आणि शनिवारच्या मध्यरात्री काराचीला भूकंपाचा शक्तिशाली धक्का बसू शकतो. या भूकंपामध्ये शहराचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.दरम्यान यापूर्वी लघारी यांनी भूकंपाच्या छोट्या-छोट्या धक्क्यांबाबत देखील भाकीत केलं होतं, ते आता खरं ठरलं आहे, त्यामुळे सध्या संपूर्ण पाकिस्तानमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

शुक्रवारची रात्र कराचीमधील नागरिकांसाठी महत्त्वाची असणार आहे, सिंध प्रातांतील सरकारने हातात वेळ असतानाच कारचीमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला पाहिजे.कराचीच्या कोरंगी आणि मालिर क्षेत्रात छोटे- छोटे क्रॅक आहेत, जे भूकंपाचे कारण ठरत आहेत, असं लघारी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान लघारी यांचं भाकीत जर खरं ठरलं तर पाकिस्तानध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. कारण पाकिस्तान सरकारच्या दाव्यानुसार सध्या तब्बल दोन कोटी लोकांचं कराचीमध्ये वास्तव्य आहे. जर या ठिकाणी खरच मोठा भूकंप आला, तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते.

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी