
आखाती देश, जिओपॉलिटिक्स, प्रॉक्सी वॉर, अरब देश म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाच्या बातम्या वाचताना काही विशिष्ट शब्द वारंवार वाचण्यात येतात किंवा कानावर पडतात. या शब्दांचा नेमका अर्थ समजून घेतल्यास आपल्याला जागतिक राजकारणाची गुंतागुंत सहज कळू शकते. चला तर मग जाणून घेऊया.
‘आखाती देश’ हा शब्द भौगोलिक परिस्थितीवरून आला आहे. जगाच्या नकाशावर पर्शियन गल्फ (पर्शियन खाडी) नावाचा पाण्याचा एक मोठा भाग आहे. या खाडीच्या किनाऱ्यावर वसलेल्या देशांना ‘आखाती देश’ म्हणतात.
‘आखाती देश’ देशांमध्ये प्रामुख्याने 7 देशांचा समावेश होतो, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), कतार, कुवेत, बहारिन, ओमान आणि इराक. इराणचाही किनारा या खाडीला लागून आहे, पण राजकीय संदर्भात ‘आखाती देश’ म्हणताना सहसा अरब राजेशाही असलेल्या देशांचा उल्लेख होतो. हे देश खनिज तेलाचे सर्वात मोठे साठे असलेले देश म्हणून ओळखले जातात.
अनेकदा लोक ‘इराण’ला अरब देश समजण्याची चूक करतात, पण इराण अरब नाही. अरब देश म्हणजे असे देश जिथे ‘अरबी’ ही मुख्य भाषा आहे आणि तिथली संस्कृती अरबी आहे.
सौदी अरेबिया, इजिप्त, जॉर्डन, सीरिया हे अरब देश आहेत. याउलट, इराणमध्ये ‘पर्शियन’ (फारसी) भाषा बोलली जाते आणि त्यांची वांशिक ओळख वेगळी आहे. त्यामुळे इराण हा एक ‘इस्लामिक देश’ आहे, पण ‘अरब देश’ नाही.
हा इस्लाममधील दोन प्रमुख पंथ आहेत. इराण हा जगातील सर्वात मोठा ‘शिया’ बहुल देश आहे, तर सौदी अरेबिया आणि इतर अनेक अरब देश ‘सुन्नी’ बहुल आहेत. मध्यपूर्वेतील अनेक युद्धांमागे या दोन पंथांमधील वर्चस्वाची लढाई हे एक छुपे कारण असते. लेबनॉनमधील ‘हिजबुल्ला’ आणि येमेनमधील ‘हुथी’ बंडखोरांना इराण पाठिंबा देतो कारण ते शिया विचारधारेचे आहेत.
जेव्हा दोन मोठे देश स्वतः समोरासमोर न लढता, दुसऱ्या लहान गटांना किंवा देशांना शस्त्रास्त्रे देऊन एकमेकांविरुद्ध लढवतात, तेव्हा त्याला ‘प्रॉक्सी वॉर’ म्हणतात. इराण थेट अमेरिकेशी किंवा इस्रायलशी लढण्याऐवजी हिजबुल्ला किंवा हमाससारख्या संघटनांना मदत करतो. हे इराणचे ‘प्रॉक्सी’ आहेत.
हा शब्द भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील भागासाठी वापरला जातो. यात इस्रायल, पॅलेस्टाईन, लेबनॉन आणि सीरिया या भागांचा समावेश होतो. या भागातील संघर्षाला अनेकदा ‘लेव्हंटमधील अस्थिरता’ म्हटले जाते.
हा शब्द इस्रायलच्या संदर्भात येतो. ज्यू लोकांसाठी त्यांचे हक्काचे स्वतंत्र राष्ट्र (इस्रायल) असावे, या विचारधारेला ‘झिओनिझम’ म्हणतात. इराण या विचारधारेचा कट्टर विरोध करतो.
अमेरिका वारंवार इराणवर ‘सॅन्क्शन्स’ लावते. याचा अर्थ असा की, इराणला जगात आपला माल (विशेषतः तेल) विकण्यास किंवा दुसऱ्या देशांकडून वस्तू विकत घेण्यास बंदी घातली जाते. यामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातो.
एखाद्या देशाची भौगोलिक परिस्थिती (उदा. त्याचे स्थान, तिथले तेल, समुद्रकिनारा) त्याच्या राजकारणावर आणि परराष्ट्र धोरणावर कसा परिणाम करते, याचा अभ्यास म्हणजे ‘जिओपॉलिटिक्स’.
“इराण-इस्रायल युद्धामुळे जगाचे जिओपॉलिटिक्स बदलणार आहे,” असे वाक्य आपण बातम्यांमध्ये ऐकतो. याचा अर्थ असा की, या युद्धामुळे जगातील सत्तेची समीकरणे, तेलाचे भाव आणि देशांचे एकमेकांशी असलेले संबंध बदलतील.