AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा विमानात अचानक सुरु झाली ‘ए़डल्ट फिल्म’, प्रवाशांची झाली गोची…

पाटणा रेल्वे स्थानकात मागे अचानक 'ब्ल्यू फिल्म' सुरु झाल्याने खळबळ उडाली होती. तीन मिनिटे सर्व टीव्ही स्क्रीनवर याचे प्रक्षेपण सुरु असल्याने अनेक लोकांनी टीका केली होती. असाच काहीसा प्रकार आता चक्क विमानात घडला आहे. विमानात चक्क प्रोढासाठीची फिल्म लागल्याने खळबळ उडाली आहे.

जेव्हा विमानात अचानक सुरु झाली 'ए़डल्ट फिल्म', प्रवाशांची झाली गोची...
plane adult video
| Updated on: Oct 08, 2024 | 12:23 AM
Share

पाटणा रेल्वे स्टेशनवर मागे टीव्ही स्क्रीनवर अचानक एडल्ट फिल्म सुरू झाल्याने खळबळ उडाली होती. आता तसाच प्रकार विमानात घडला आहे.परंतू आपल्या देशात नव्हे तर अन्य एका देशात हे तसेच प्रकरण घडले आहे. वास्तविक, हे प्रकरण सिडनी (ऑस्ट्रेलिया) ते हानेडाला (जपान) जाणाऱ्या विमानात घडले आहे. क्वांटास फ्लाइट नंबर QF59 मध्ये हा विचित्र प्रकार घडला. अचानक फ्लाइटच्या इन-फ्लाइट एंटरटेनमेंट सिस्टममध्ये एक प्रौढांसाठीचा चित्रपट सुरू झाला. कुटुंबियांसोबत बसलेल्या प्रवाशांमध्ये गडबड आणि गोंधळ उडाला. सिटवरच्या स्क्रीनवर एका अश्लील चित्रपटाची सुरुवात झाल्याने विशेषत: लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्यांची गोची झाली.

हा ‘डॅडी’ नावाचा एक चित्रपट होता, ज्यात डकोटा जॉन्सन आणि सीन पेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अनेक प्रौढांसाठीची दृश्ये आहेत, ज्यामुळे प्रवाशांना आपल्या लहान मुलांसोबत ती पाहताना त्यांच्या माना खाली गेल्या. Reddit वर आपला अनुभव शेअर करताना एका प्रवाशाने सांगितले की चित्रपटाला थांबवणे, स्क्रीन अंधुक करणे किंवा ती बंद करणे शक्य झाले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्रवाशांमध्ये गोंधळ होऊनही चित्रपट सुरूच होता, आणि त्यामुळे आमच्याकडे आमच्याकडे कुटुंबासह डोळे बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. ही फिल्म बंद करण्यासाठी तासभर वेळ लागला!

प्रवाशांची बिकट अवस्था

हा चित्रपट सुरू राहिल्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. क्वांटास एअरलाइन्सने या घटना घडल्याचे मान्य केले आणि सांगितले की त्यांच्या इन-फ्लाइट मनोरंजन प्रणालीमध्ये तांत्रिक त्रुटी होती, ज्यामुळे प्रवाशांनी चित्रपट निवडण्याचा पर्याय शिल्लक राहीला नाही.

कॉन्टास विमान कंपनीने न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की जेव्हा क्रूच्या लक्षात आले की हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रवाशांसाठी योग्य नाही तेव्हा त्यांनी हा चित्रपट थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी न झाल्याने या चित्रपटाला सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांसाठी असा पर्याय चुकीने देण्यात आला.news.com.au शी बोलताना, क्वांटास विमान कंपनीच्या प्रवक्त्याने या घटनेबद्दल माफी मागितली आणि सांगितले की ते अशा परिस्थितीत नेहमीच कौटुंबिक अनुकूल चित्रपट लावण्याचा प्रयत्न असतो. ते असेही म्हणाले की या प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.