AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणने कुठे दडवले यूरेनियम? 400 KG च्या युरेनियमचा पुरावा मिळाला नाही?, अमेरिकेचा बस्टर बॉम्बहल्ला वाया गेला का ?

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या 60 टक्के शुद्ध असलेल्या समृद्ध युनियमच्या ठावठिकाण्याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहे. हल्ल्या आधी हे संवेदनशील आण्विक मेटरील गुप्त स्थानी पोहचवले होते का ? या रहस्यावरुन इराणच्या आण्विक सत्ता होण्याचे भविष्य अवलंबून आहे.

इराणने कुठे दडवले यूरेनियम? 400 KG च्या युरेनियमचा पुरावा मिळाला नाही?, अमेरिकेचा बस्टर बॉम्बहल्ला वाया गेला का ?
| Updated on: Jun 23, 2025 | 9:59 PM
Share

इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेने बॉम्बहल्ले केल्यानंतर इराणमधील समृद्ध युरेनियमचा साठी नष्ट झाला की तो वाचला ? असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण अलिकडेच अमेरिकेने रातोरात एक मोठा हल्ला करीत इराणच्या तीन प्रमुख आण्विक साईट्सना लक्ष्य केले आहे. हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र इराणच्या प्रमुख युरेनियम साईट्सना संपूर्णपणे नष्ट केल्याचा दावा केला आहे.

या हल्ल्यासाठी अमेरिकेने अत्याधुनिक B-2 स्टील्थ बॉम्बर्सने 30,000 पाऊंड वजनाचे बंकर -बस्टर बॉम्बचा वापर केला आहे. परंतू इतक्या भयानक हल्ल्यानंतरही अमेरिकेतच संशय घेतला जात आहे की इराणचा युरेनियम साठा सुरक्षित आहे.जर हा दावा खरा असेल तर प्रश्न उरतो की 400 किलोग्रॅम एनरिच्ड यूरेनियमला इराणने कसे वाचवले आणि तो कुठे लपवून ठेवला आहे.

यूरेनियम गेले कुठे ?

इराणच्या आण्विक तळांवर बॉम्ब हल्ले केल्यानंतर रेडिएशन झाल्याचे कोणतेही वृत्त आलेले नाही. त्यामुळे इराण जवळ असलेले 408 किलोग्रॅम यूरेनियम जे 60 टक्क्यांपर्यंत शुद्ध म्हणजे समृद्ध आहे. (आण्विक शस्र बनवण्याच्या पातळीपर्यंत )आता हे युरेनियम कोठे आहे असा सवाल निर्माण झाला आहे.अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेच्या एअर स्ट्राईकची कबूली दिली, परंतू अमेरिकेच्या युरेनियत संदर्भातील दाव्यांवर अनाकलीयन रित्या मौन बाळगले आहे.वास्तविक इराणी अधिकाऱ्यांनी या हल्ल्याने झालेल्या नुकसानाचा कोणताही विस्तृत माहीती जाहीर केलेली नाही.

एका विधानाने सर्व हल्ल्यातील हवाच निघाली…

बीबीसी वृतसंस्थेने एका इराणी अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे की, “ही संवेदनशील सामग्री तिथून आधीच काढून टाकण्यात आली आहे.” इराणी अधिकाऱ्यांच्या या दाव्यामुळे जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. तरीही या विषयावर पाश्चात्य तज्ञ्जांमध्ये स्पष्ट मतभेद आहेत.”हे सर्व ती युरेनियमची सामग्री आता कुठे आहे यावर अवलंबून आहे”असे फायनान्शियल टाईम्सने अमेरिकेचे माजी आण्विक नेगोशिएटर रिचर्ड नेफ्यू यांचे म्हणणे मांडले आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.