Attack on Capitol Hill | ट्रम्प यांचा आडमुठेपणा की राजद्रोह, अमेरिका का धुमसतेय? सगळा घटनाक्रम!

#WashingtonDC | अमेरिकेत हे हिंसाचाराचं तांडव कुणी घातलं? याचा घटनाक्रम काय?

Attack on Capitol Hill | ट्रम्प यांचा आडमुठेपणा की राजद्रोह, अमेरिका का धुमसतेय? सगळा घटनाक्रम!
डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल भवनावर हल्ला केला त्यावेळी टिपलेला हा फोटो
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 1:29 PM

वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेली अमेरिका (United States Of America) गृहयुद्धाच्या कचाट्यात सापडते की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे. कारण, डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी (Donald Trump Supporters) कॅपिटल भवनावर (Capitol Hill) हल्ला केला आणि यामध्ये मोठा हिंसाचार उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत ( 7 जानेवारी 2021 ) 4 जण दगावल्याची माहिती आहे. एक महिला पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडली तर 3 जण या हल्ल्यादरम्यान जखमी झाले. ज्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वॉशिंग्टन (Washington DC) पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, अमेरिकेत हे हिंसाचाराचं तांडव कुणी घातलं? याचा घटनाक्रम काय? आणि हे डोनाल्ड ट्रम्प समर्थक आले तरी कुठून? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.  (whole story of the attack on the Capitol building by Trump supporters)

ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल भवनावर हल्ला केला, त्यावेळी लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे लपून बसावं लागले

ट्रम्प यांचा आडमुठेपणामुळे अमेरिकेच्या लोकशाहीवर संकट

अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत दारुन पराभव झाला. त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांनी तब्बल 70 लाखांहून अधिक इलेट्रोल मतांनी हरवलं. मात्र, निवडणुकीत घोटाळा झाला, असं म्हणत ट्रम्प यांनी आपला पराभव नाकारला. याविरोधात ते अमेरिकेतल्या कोर्टातही गेले. पण, कोर्टानंही त्यांना फटकारलं आणि ही निवडणूक योग्य असून जो बायडन विजेते असल्याचं सांगितलं. एवढं होऊनही ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नाही. आणि ट्विटरवरुन सतत आपली मतं मांडत राहिले. ट्विटरनंही ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचं सांगत फॅक्ट चेकसाठी त्यांच्या प्रत्येक ट्विटखाली निळ्या रंगात एक टीप लिहली. (whole story of the attack on the Capitol building by Trump supporters)

कॅपिटल भवनामध्ये शिरल्यानंतर पोलीस आणि ट्रम समर्थकांमध्ये बाचाबाची झाली

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ट्वीटमुळं हिंसाचार सुरु

6 जानेवारीला कॅपिटल भवनामध्ये इलेट्रोल मतांची मोजणी होणार होती. त्यात जो बायडन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार होती. मात्र, पराभव मान्य न करणाऱ्या ट्रम्प यांनी ट्विट करत आपल्या समर्थकांना कॅपिटल भवनावर चढाई करण्याचा संदेश दिला. यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रम्प समर्थक कॅपिटल भवनाबाहेर जमा झाले. आणि त्यांनी इमारतीत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. हे करताना ट्रम्प समर्थकांनी अनेक रासायनिक पदार्थांचा वापर केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. ज्यामध्ये 4 लोक दगावले आहेत, तर 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते आहे.

ट्रम्प समर्थकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला

रिपब्लिकन पक्षासह उपराष्ट्रपतींचीही ट्रम्प यांच्यावर टीका

अमेरिकेचे सध्याचे उपराष्ट्रपती असलेल्या माईक टेन्स यांनीही ट्रम्प यांना चांगलंच सुनावलं आहे. ट्रम्प यांनी लोकशाहीवर हल्ला केल्याचा थेट आरोप त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्यासोबत उपराष्ट्रपतीपद भुषवलेल्या टेन्स यांनी केला. शिवाय ट्रम्प यांचा पराभवच झाला आहे, तो आता बदलू शकत नाही असं म्हणत त्यांनीही या सगळ्यातून हात झटकले.

ट्रम्प समर्थकांना आवरण्यासाठी पोलीस आधीपासूनच सज्ज होते, मात्र समर्थकांची संख्या मोठी असल्यानं त्यांना नियंत्रणात आणणं अवघड गेलं

डोनाल्ड ट्रम्प यांना बायडन यांचा निर्वाणीचा इशारा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. लोकशाहीला जगवण्यासाठी काहीही करावं लागलं तर ते करु असं म्हणत त्यांनी कठोर पावलं उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या संविधानिक सभागृहावर झालेला हा हल्ला म्हणजे राजद्रोह असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं बायडन सत्तेत येताच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कडक कारवाई निश्चित मानली जात आहे.

अमेरिकेच्या संसद भवनाबाहेर ट्रम्प समर्थकांनी अशा प्रकारे गर्दी केली होती, याच गर्दीचं रुपांतर नंतर हिंसाचारात झालं

ट्विटर, फेसबुककडून ट्रम्प यांचं अकाऊंट ब्लॉक

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना ट्विटरवर कायमची बंदी आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊण्ट बारा तासांसाठी, तर फेसबुकने 24 तासांसाठी लॉक केले आहे. नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा ट्विटरने दिला. ट्विटर सुरक्षा टीमच्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प आपले तीन ट्विट्स मागे घेत नाहीत, किंवा डिलीट करत नाहीत, तोपर्यंत त्यांचे अकाऊण्ट लॉक्ड राहील असं म्हटलं आहे. तर फेसबुकनंही डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंड काही काळासाठी बंद केलं आहे. फेसबुकवरुन त्यांनी समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं, मात्र, या आवाहनातून हिंसा जास्त भडकू शकते, असं फेसबुकनं म्हटलं, आणि ट्रम्प यांचं अकाऊंटच काही कालावधीसाठी ब्लॉक केलं.

डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा होणार?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भडकाऊ ट्विटनंतर अमेरिकेत हिंसाचार उसळला. या सगळ्याला आता ट्रम्प यांना जबाबदार धरलं जातं आहे. त्यांचा विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅट पक्षासह रिपब्लिकन पक्षानंही ट्रम्प यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांनी आधीच या घटनेला राजद्रोह म्हटलं आहे, त्यामुळं राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली ट्रम्प यांना अटकही होऊ शकते. आणि त्यांना राष्ट्रपतीपदावरुन पायउतार होताच जेलमध्येही जावं लागू शकतं. जो बायडन हे मोठ्या मताधिक्यानं ही निवडणूक जिंकले आहे. अमेरिकेच्या दोन्ही सभागृहात त्यांचं बहुमत आहे, याच जोरावर ते कुठलंही ठराव पास करुन घेऊ शकतात. ज्याचा मोठा फटका ट्रम्प यांना बसण्याची शक्यता आहे.

200 वर्षांनंतर अमेरिकेच्या संसदेवर असा हल्ला, 20 जानेवारीआधी ट्रम्प यांना पायउतार करणार?

अमेरिकेच्या संसदेवर अशा प्रकारचा हल्ला गेल्या 200 वर्षात झालेला नाही. अमेरिकेला जगातील सर्वात मोठी लोकशाही समजलं जातं. शांततापूर्ण निवडणुका आणि मजबूत लोकशाही हीच अमेरिकेची आतापर्यंतची ओळख आहे. मात्र, या सगळ्याला 6 जानेवारीच्या घटनेनं मोठा धक्का बसला आहे. आणि हा हल्ला त्यावेळी झाला, ज्यावेळी जो बायडन यांना अधिकृतरित्या राष्ट्रपती म्हणून निवडलं जात होतं. त्यामुळंच ट्रम्प यांना 20 जानेवारी आधीच आपल्या पदावरुन हटवलं जाण्याची शक्यता आहे. विशेष अधिकाराखाली अमेरिकेच्या संसदेकडून ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या:

अमेरिकेत संसदेवर हल्लाबोल, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊण्ट लॉक, कायमस्वरुपी बंदीचा इशारा

स्पेशल रिपोर्ट: अमेरिका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर आहे का?

(whole story of the attack on the Capitol building by Trump supporters)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.