अरे बापरे! म्हणून चीनमध्ये कोरोना बेझार झाला? शास्त्रज्ञ कामाला, आता तोडगा कधी?

2019 च्या डिसेंबरचाच महिना होता जेव्हा चीनमध्ये पहिल्यांदा कोरोना नावाच्या विषाणूचा फैलाव झाला. देशात महामारी पसरलीय, ही गोष्ट चीननं जगापासून लपवली.

अरे बापरे! म्हणून चीनमध्ये कोरोना बेझार झाला? शास्त्रज्ञ कामाला, आता तोडगा कधी?
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 11:23 PM

बीजिंग : घाईघाईन शोधलेल्या कोरोना लसीमुळेच चीनचा घात झाला का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण सध्या जगातली सर्वाधिक रुग्णवाढ चीनमध्ये सुरु झालीय. नेमकं काय आहे त्यामागचं कारण, आणि जगात चीनमधल्या रुग्णवाढीची धाकधूक का आहे? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. चीनमध्ये कोरोना हाताबाहेर जातोय आणि भारतात रोज फक्त काही शे रुग्ण निघतायत. महाराष्ट्रात मुंबई-पुणे सोडलं तर इतर जिल्ह्यात फक्त हातांच्या बोटांवर मोजण्याइतके रुग्ण आहेत. पण चीनमधल्या कोरोनाची जगात इतकी भीती का आहे? जग पुन्हा का धास्तावलंय. याचं उत्तर आजपासून बरोब्बर 3 वर्ष आधी म्हणजे डिसेंबर 2019 मध्ये मिळतं.

2019 च्या डिसेंबरचाच महिना होता जेव्हा चीनमध्ये पहिल्यांदा कोरोना नावाच्या विषाणूचा फैलाव झाला. देशात महामारी पसरलीय, ही गोष्ट चीननं जगापासून लपवली, त्यामुळे मार्च 2020 उजाडेपर्यंत 70 टक्के जगात कोरोना पसरला. म्हणून चीनमधल्या या रुग्णवाढीकडे सारं जग गांभीर्यानं बघतंय.

हे सुद्धा वाचा

2020 मध्ये सर्वात आधी चीन, त्यानंतर इटली, नंतर फ्रान्स, स्पेन, अमेरिका आणि त्यानंतर भारतात कोरोना संक्रमण वाढलं होतं.

2022 मध्येही सर्वात आधी चीन, नंतर जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत रुग्णवाढ झालीय.

2020 च्या लॉकडाऊननंतर चीननं जगात सर्वात आधी लॉकडाऊन उठवलं. कोरोना संपवल्याचाही दावा चीननं केला होता. मात्र तरीही चीनमध्ये फैलाव का होतोय? ते ही समजून घेऊयात.

चीनने सिनोवॅक नावाची लस आणली होती, जी चीनच्या शास्रज्ञांनी कोरोनावर शोधून काढलीय. मात्र ओमिक्रॉनसारख्या व्हेरियंटवर चिनी सिनोवॅक फक्त 50 टक्केच परिणामकारक आहे.

अमेरिकन फायझर ओमिक्रॉन व्हेरियंटवर 90 टक्के प्रभावी आहे. रशियाची स्पुटनिक 95 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला गेला. भारताची कोव्हिशिल्ड सुद्धा ओमिक्रॉनवर 80 टक्के परिणामकारक ठरली. मात्र चिनी सिनोवॅक लस ओमिक्रॉनच्या व्हेरियंटला रोखू शकली नाही.

आता कोरोनाचा जो व्हेरियंट चीनमध्ये पसरलाय, ते कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचंच नवं रुप आहे. म्हणून चीन 2 वर्षात दुसऱ्यांदा कोरोनाच्या दृष्टचक्रात सापडलाय.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.