US Attack On Venezuela : वेनेजुएलावर अमेरिकेने हल्ला का केला? इतका छोटासा देश ट्रम्प यांच्या डोळ्यांना का खुपतोय? या युद्धामागे कारण काय?
US Attack On Venezuela : डोनाल्ड ट्रम्प एकाबाजूला रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र, दुसऱ्याबाजूला त्यांनी नव्या युद्धाची सुरुवात केली आहे. यातून अमेरिकेचा दुटप्पीपणा दिसला. पण अमेरिकेने वेनेजुएलासारख्या इतक्या छोट्या देशावर हल्ला का केला?.

अमेरिकेने आज वेनेजुएलावर हल्ला केला. अनेक दिवसांपासून अमेरिका वेनेजुएलाला इशारे, धमक्या देत होता. अखेर आज अमेरिकेने वेनेजुएलावर हल्ला केला. वेनेजुएलाची राजधानी काराकास येथे कमीत कमी सात स्फोटाचे आवाज ऐकू आले. वेनेजुएला एक छोटा देश असून अमेरिकेचा शेजारी आहे. वेनेजुएलापासून अमेरिकेला कोणताही धोका नव्हता. इतकी वर्ष शेजारी असलेला हा देश अमेरिकेच्या डोळ्याला अचानक कसा खुपू लागला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कुठली गोष्ट खटकली? ट्रम्प हे तिथल्या ड्रग्ज सिंडिकेटच कारण पुढे करत असले, तरी ते वरवर आहे. कारण वेनेजुएलावर हल्ला करण्यामागे अमेरिकेचे कारण खूप वेगळं आहे.
ट्रम्प यांनी वेनेजुएलावर हल्ला करण्याचा आदेश दिला. यामागे खरं कारण आहे तेल. तेल ही वेनेजुएलाची खरी ताकद आहे. वेनेजुएलाकडे जगातील सर्वाधिक तेल साठे आहेत. वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यूच्या रिपोर्टनुसार, 303,008 मिलियन बॅरल तेलासह वेनेजुएला टॉपवर आहे. तेलाच्या निर्यातीतून होणाऱ्या कमाईतून वेनेजुएलाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते. एकवेळ वेनेजुएलाच्या कमाईत तेलाचा वाटा 90 टक्के होता. इथे नैसर्गिक गॅस, सोनं, बॉक्साइट आणि कोयला खाणी सुद्धा आहेत. वेनेजुएला सरकारच्या कमाईचं ते एक माध्यम आहे. पण तेलातून होणाऱ्या कमाई समोर या अन्य स्त्रोताच्या उत्पन्नाच फार महत्व नाहीय.
राजकीय अस्थिरता का आली?
वेनेजुएला त्याशिवाय कॉफी, मका, तांदूळ आणि ऊसाच्या पिकांमधून कमाई करतो. पण देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचं फार योगदान नाहीय. कारण वेनेजुएलाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने तेलावर अवलंबून आहे. तेलाचं एक्सपोर्ट वाढवण्याला प्राधान्य दिलं. तेलाच्या किंमती घसरल्यानंतर राजकीय अस्थिरता आली. त्याचा थेट फटका इथल्या अर्थव्यवस्थेला बसला. 2013 पासून वेनेजुएलामध्ये महागाई गगनाला भिडली आहे. बेरोजगारी वाढली. अन्नाचं संकट निर्माण झालं.
वेनेजुएलाने काय धडा घेतला?
वेनेजुएलाने यातून धडा घेतला व तेलावरील अवलंबित्व कमी करत गेला. इथल्या सरकारने कृषी आणि पर्यटन वाढवण्यावर जोर दिला. बदल होतोय पण तेल आजही या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
ट्रम्पची नजर कशावर?
अमेरिकेने अनेक वेनेजुएलामध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. वेनेजुएलाचे माजी राष्ट्रपती ह्यूगो शावेज पासून वर्तमान राष्ट्रपती निकोलस मादुरोपर्यंत कोणीही अमेरिकेसमोर मैत्रीचा हात पुढे केला नाही. अमेरिकेच्या हुकूमशाही धोरणांसमोर नाही झुकले. ट्रम्प यांच्यासोबतही असच झालं. म्हणून अमेरिका या देशात आपला हस्तक्षेप वाढवण्याचा प्रयत्न करतोय. खासकरुन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प.
