
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पाकिस्तानचा जिहादी विचारांचा लष्करप्रमुख असीम मुनीरला व्हाइट हाऊसमध्ये लंचसाठी निमंत्रित केलं होतं. थेट अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी मुनीरला दुपारच्या भोजनाला निमंत्रित केल्यामुळे पाकिस्तानात अनेकांना आकाश ठेंगणं वाटू लागलं आहे. त्यांचा आनंद गगनात मावत नाहीय. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून जबर मार खाणाऱ्या पाकिस्तानला आणि त्यांच्या माध्यमांना हा डिप्लोमॅटिक विजय वाटतोय. पण असीम मुनीरला डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक थेट लंचला का बोलावलं? हा प्रश्न देखील कित्येकांच्या मनात निर्माण झालाय. आपल्या पहिल्या कार्यकाळात हेच डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानवर सडकून टीका करत होते. पाकिस्तानवर आतापर्यंत अमेरिकेने कोट्यवधी डॉलर खर्च केले, त्याचा काय फायदा झाला? असा ट्रम्प यांचा प्रश्न होता. पण त्याच ट्रम्पना आता अचानक पाकिस्तान इतका जवळचा का वाटू लागला? हा मुख्य प्रश्न आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पाकिस्तानचा जिहादी विचारांचा लष्कप्रमुख असीम मुनीरच भरपूर कौतुक केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या या असीम मुनीरने भारत-पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. “युद्धामध्ये न जाता, थांबवण्याचा निर्णय घेतला, याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे आहेत. म्हणून मी मुनीरला इथे बोलावलं” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आय लव्ह पाकिस्तान म्हणताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा कौतुक केलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत असा अचानक बदल झाला त्यामागे काही कारण आहेत
अमेरिकेसारखा देश कधीच कोणाला कुठल्या कारणाशिवाय जवळ करत नाही. या जगात काहीच फ्रि मध्ये मिळत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज असीम मुनीरला लंचसाठी बोलावलय त्यामागे काही कारणं आहेत. अमेरिका अजून इस्रायल-इराण युद्धात उतरलेली नाही. पण उद्या अमेरिका सहभागी झाली, तर त्यांना जवळच्या एअरबेसेसची गरज पडू शकते. अफगाणिस्तान युद्धाच्यावेळी अमेरिकेने पाकिस्तानचे एअरबेस आणि इंटेलिजन्सचा वापर केला होता. इराण सुद्धा इस्लामिक देश आहे. तिथे असलेल्या पाकिस्तानच्या इंटेलिजन्स नेटवर्कचा अमेरिकाल वापर करायचा असू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असण्याबरोबर बिझनेसमॅन सुद्धा आहेत. आपल्या दुसऱ्याकार्यकाळात ते कौटुंबिकत बिझनेस वाढवण्यासाठी सुद्धा पदाचा वापर करत आहेत. असीम मुनीरला जे बोलवलय त्यामागे क्रिप्टो बिझनेसचा विस्तार हे सुद्धा कारण असू शकतं.