AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेडवर केवळ कुशीवर वळली आणि हाड तुटले, टॅनिंगपासून वाचण्यासाठी महिला करायची हे काम, आता हॉस्पिटलच्या चकरा…

हे अजब प्रकरण उघडकीस आल्यानंतर, लोकांमध्ये आता चर्चा सुरु आहे की अजिबातच सूर्यप्रकाश न घेणे देखील किती धोकादायक असू शकते.

बेडवर केवळ कुशीवर वळली आणि हाड तुटले, टॅनिंगपासून वाचण्यासाठी महिला करायची हे काम, आता हॉस्पिटलच्या चकरा...
| Updated on: May 24, 2025 | 10:39 AM
Share

उन्हाळा येताच आपण त्वचेच्या रक्षणासाठी स्कार्फ गुंडाळतो किंवा गॉगल लावातो. अनेक तरुणी उन्हात बाहेर पडताना ही काळजी घेतातच. उष्णतेपेक्षाही तरुणींना उन्हाने त्वचा रापण्याची म्हणजेच काळवंडण्याची भीती वाटत असते. म्हणून टॅनिंगपासून बचावासाठी ही काळजी अनेक तरुणी घेत असतात. हे सत्य आहे की उन्हात राहिल्याने हानिकारक युव्ही किरणांचा धोका असतो. परंतू याचा अर्थ उन्हापासून एकदमच फारकत घेण्याचा धोका कितपत असू शकतो याचे एक मासलेवाईक उदाहरण घडले आहे. यात एका महिलेला आता हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत.

बेडवर कुस बदलताना हाड तुटले

अनेक उन्हात जराही फिरत नाही. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकते. एका महिलेला असाच त्रास भोगावा लागला आहे. तिच्या सोबत अशा विचित्र प्रकार घडला जो कोणाच्याही बाबतीत व्हायला नको. एका ४८ वर्षांच्या महिलेले हाड रात्री बेडवर एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर वळताना तुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेने अनेक वर्षे उन्हापासून बचावासाठी केलेल्या उपायाने हा प्रताप घडल्याचे म्हटले जाते.

चीनमध्ये हा हैराण करणारा प्रकार घडला आहे. चीनच्या सिचुआन प्रांताच्या चेंगडू शहरातील ही घटना आहे. महिलेने लहानपणापासून उन्हापासून वाचण्यासाठी संपूर्ण अंग झाकणारे कपडेच परिधान केले. नेहमी आपण गोरे दिसावे यासाठी तिने अंगाभोवती कपडे, गॉगल घालूनच प्रवास केला. त्यामुळे तिच्या शरीरात व्हिटामिन्स D चे प्रमाण प्रचंड कमी झाले होते.

व्हिटामिन्स D आपल्या शरीरातील कॅल्शियम शोषण आणि हाडांना मजबूत बनवण्यासाठी मदत करत असते. या महिलेला जेव्हा हॉस्पिटलमध्ये तपासले तेव्हा कळले की तिला गंभीर स्वरुपाचा ऑस्टियोपोरोसिस झाला होता. म्हणजे तिचे हाडे अतिशय कमजोर झाली होती. त्यामुळे साध्या कुस बदलल्याने तिचे हाड मोडल्याचे निदान झाले आहे.

उन्हात फिरणे का महत्वाचे

तिसाव्या वर्षांनंतर आपली हाडे हळूहळू कॅल्शियम गमावतात.त्यावेळी हाडे मजबूती होण्यासाठी व्हिटामिन्स डी रिच फूड्स खाणे किंवा आवश्यक प्रमाणात उन्ह खाणे गरजेचे असते. जास्त उन्हात फिरणेही धोकादायक असते मात्र कोवळ्या उन्हात फिरल्याने आपल्या डी जीवनसत्व अगदी फुकटात मिळते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी कोवळ्या उन्हात फिरणे खूपच गरजेचे असते.

Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा