महिलेने फ्लॅट विकला,आणि आता 5 स्टार रिसॉर्ट्समध्ये राहतेय अगदी फ्री, तुम्हीही ट्राय करु शकता
एकेकाळी त्या कॉर्पोरेट मार्केटिंगमध्ये होत्या. परंतू त्यांनी रिमोट मार्केटिंग जॉबमध्ये शिफ्ट केले. त्यानंतर त्या मेक्सिको, कोस्टा रिका, जमॅका आणि कुराकाओ सारख्या ठिकाणी सुंदर रिसॉर्ट्समध्ये मोफत राहू लागल्या.

तुम्हाला फाईव्ह स्टार रिसॉर्ट्समध्ये मोफत राहायला मिळाले आणि वर समुद्र किनाऱ्यावर कॉकटेल प्यायचे, स्वादिष्ट भोजनावर ताव मारायचा हे सर्व अगदी फ्री मिळाले तर … हे स्वप्नवत वाटत असेल परंतू काही लोक असे आरामात करीत आहेत आणि पैसे देखील वाचवत आहेत. फ्लोरिडा येथील एलिझाबेथ शोर्स देखील अशीच एक महिला आहे. ज्यांनी त्यांचा स्वत:चा फ्लॅट विकला आणि ते पैसे बँकेत ठेवले. आणि त्या जगभरातील रिसॉर्टमध्ये मोफत राहून आपले जीवन ऐशोरामात जगत आहेत. असे करणे खरोखरच शक्य आहे का?
एलिझाबेथ ( Elizabeth Shores ) यांनी साल २०१२ मध्ये एका रात्री इंटरनेटवर सर्च करताना फिटनेस प्रो ट्र्रव्हल प्रोग्रॅमचा शोध घेतला.या प्रोग्रॅममध्ये दिवसा दोन योगा क्लास शिकवण्याच्या बदल्यात मेक्सिको, कोस्टा रिका, जमॅका सारख्या फाईव्ह स्टार रिसॉर्टमध्ये मोफत राहण्याची ऑफर देतो. तुम्ही देखील ही संधी मिळवू शकता.
ट्रॅव्हल हॅक
एलिझाबेथ यांनी एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत देताना सांगितले की हे एक असे ट्रॅव्हल हॅक होते ज्याला नजर अंदाज करणे शक्य नव्हते. मला योगा करायला आवडायचे. परंतू त्यास त्यांनी कधी पेशा किंवा व्यवसाय म्हणून पाहीले नव्हते. परंतू प्रवास आणि मोफत राहायला मिळते म्हणून ही ऑफर त्यांनी स्वीकारली. त्यांच्या तीव्र इच्छाशक्तीने योगाचे सर्टीफिकेशन घेण्यासाठी प्रेरित केले.




या ऑफरने त्यांचे जीवनच बदलले
काही आठवड्यानंतर त्या एका शानदार रिसॉर्टमध्ये समुद्र किनाऱ्यावर लोकांना योग शिकवताना दिसल्या. त्या म्हणाल्या की दोन सकाळचे क्लास शिकवल्याने नंतर रिसॉर्टमध्ये थांबण्याचा, जेवण आणि ड्रींक्ससोबत संपूर्ण आदरातिथ्य मोफत मिळते. तुम्हाला केवळ बुकींग फी आणि हवाई भाडे द्यावे लागले. या ऑफरने त्यांचे जीवनच बदलले.
मी संपूर्ण दिवस मजा करायचे
त्या म्हणाल्या की, “मी सकाळी १० वाजेपर्यंत माझे योगा क्लास संपवत असे. मग मी संपूर्ण दिवस मजा करायचे, ज्यामध्ये स्नॉर्कलिंग, रूम सर्व्हिस, क्लायंट कॉल किंवा समुद्र पाहणे समाविष्ट होते.” प्रत्येक रिसॉर्टचा खर्च प्रति रात्री $ १,००० (सुमारे ८६ हजार रुपये) पेक्षा जास्त होता. पण गेल्या दशकात आम्ही सुमारे १ लाख डॉलर्स ( ८५ लाख रुपये ) किमतीच्या मोफत सुविधांचा लाभ घेतला असल्याचे त्या म्हणतात.
प्रत्येक करार सात रात्रीचा असतो. ज्यात सहा दिवस शिकवणे आणि एक दिवसाची सुट्टी असते. २०१५ मध्ये एलिझाबेथ आणि त्यांच्या पतीने त्यांचा फ्लॅट विकून फूल टाईम रिसॉर्ट लाईफ सुरु केली. एलिझाबेथ हसत सांगतात की, ‘योग आणि रिमोट वर्कने आम्ही सर्व मॅनेज केले. न भाडे, न शॉपिंग, केवळ सुटकेस आणि मजबूत वायफाय’ माझ्या मुलीच्या जन्मानंतर आम्ही आमच्या कायमस्वरुपी घरात अमेरिकेत परतण्याचा निर्णय घेतल्याचे त्या सांगतात.
फुल टाईम रिसॉर्ट लाईफ शानदार होती
त्या म्हणतात आता आम्ही वर्षातून एक-दोन कॉन्ट्रॅक्ट बुक करतो, फुल टाईम रिसॉर्ट लाईफ एक शानदार लाईफ होती. परंतू आता कुटुंबात सोबत राहण्याची वेळ आहे. त्या सल्ला देतात जर तुमच्याकडे काही स्कील असेल, उदा. योगा तर त्याचा वापर कर. ते तुमचे आयुष्य बदलेल आणि अशा ठिकाणांवर तुम्हाला नेईल. जेथे जाण्याचा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल…