सूपवरून झाला वाद; महिलेने मॅनेजरला दिली भयानक शिक्षा, गुन्हा दाखल

| Updated on: Nov 11, 2021 | 10:31 AM

हॉटेलच्या सर्विसवर नाराज झाल्याने महिलेने चक्क गरम सूप हॉटेल मॅनेजरच्या तोंडावर फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेतून हॉटेल मॅनेजर थोडक्यात वाचली आहे.

सूपवरून झाला वाद; महिलेने मॅनेजरला दिली भयानक शिक्षा, गुन्हा दाखल
Follow us on

वॉशिग्टन – अमेरिकेच्या (America) टेक्सासमधील एका हॉटेलमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने सूपची ऑडर्र दिली, वेटर या महिलेसाठी सूप घेऊन आला. मात्र हॉटेलच्या सर्विसवर नाराज झाल्याने संबंधित महिलेने गरम सूप चक्क मॅनेजरच्या तोंडावर फेकले. सुदैवाने या घटनेत मॅनेजरला जास्त इजा पोहोचली नाही. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या महिलेसोबत तिचा साथीदार देखील होता. घटनेनंतर दोघेही हॉटेलमधून फरार झाले. या बातमीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मॅनेजर आणि महिलेचा वाद 

मिळालेल्या माहितीनुसार सात नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. या महिलेने हॉटेलमधून सूप मागवले होते. वेटर सूप घेऊन महिलेच्या घरी पोहोचला. मात्र जेव्हा महिलेने सूप असलेल्या रॅपरचे झाकण उघडले, तेव्हा तीने हॉटेल मॅनेजरला सांगितले, सूप इतके गरम आहे, की त्यामुळे प्लॅस्टिकचे रॅपर पिघळत आहे. त्याचे काही थेंब त्या सुपात पडले असून, ते पिण्यायोग्य राहिले नाही. यावरून या महिलेचा हॉटेल मॅनेजरशी वाद झाला. वादानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये ही महिला त्या हॉटेलमध्ये पोहोचली. महिलेसोबत अन्य एक पुरूष साथिदार देखील होता. हॉटेलमध्ये पुन्हा एकदा महिलेचा आणि हॉटेलच्या मॅनेजरचा वाद झाला. वादनंतर राग अनावर झाल्याने महिलेने ते सूप मॅनेजरच्या तोंडावर फेकले. या घटनेतून  तो थोडक्यत बचावला आहे. घटनेनंतर महिला साथीदारासह फरार झाली.

पोलिसांकडून फरार महिलेचा शोध 

दरम्यान या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून, आता पोलीस या आरोपी महिलेचा शोध घेत आहेत. ती महिला हॉटेलपर्यंत येईपर्यंत सूप थोडे थंड झाले होते. त्यामुळे जास्त इजा झाली नाही. मात्र सूप डोळ्यात गेल्याने प्रचंड वेदना झाल्या. एका क्षणाला आता सर्व काही संपले आहे, असे मला वाटले. मात्र देवाच्या कृपेने मी या घटनेतून वाचले अशी प्रतिक्रिया हॉटेल मॅनेजरने दिली आहे.

संबंधित बातम्या 

Bihar travel : बिहारमधील ‘या’ सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट द्या!

Punjab travel : पंजाबमधील ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!

स्वस्त फिरा मस्त राहा आनंदी जगा , आशिया खंडातील सर्वात स्वस्त 5 देश