AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावर अणवस्त्र हल्ला करा…अमेरिकेत गोळीबार करणाऱ्याचा धक्कादायक व्हिडीओ, थेट बंदुकीवरच…

अमेरिकेमध्ये एक अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जग हादरल्याचे बघायला मिळत आहे. मिनियापोलिसमधील एका कॅथोलिक चर्चमध्ये प्रार्थना करणाऱ्या मुलांवर आणि काही वृद्धांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यानंतर एक धक्कादायक असा व्हिडीओ व्हायरल होताना दिसला.

भारतावर अणवस्त्र हल्ला करा...अमेरिकेत गोळीबार करणाऱ्याचा धक्कादायक व्हिडीओ, थेट बंदुकीवरच...
US
| Updated on: Aug 28, 2025 | 11:31 AM
Share

अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्याने अनेक वर्षांचे चांगलेच संबंध ताणल्याचे बघायला मिळतंय. आता अमेरिकेतील एका धक्कादायक घटनेने हृदय हेलावून गेलंय. मिनियापोलिसमधील एका कॅथोलिक चर्चमध्ये प्रार्थना करणाऱ्या मुलांवर आणि काही वृद्धांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. हेच नाही तर या गोळीबारात दोन चिमुकल्या मुलांचा जीव गेला आणि 17 जण गंभीर जखमी आहेत. हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव रॉबिन वेस्टमन आहे. त्याने हा हल्ला करण्याच्यापूर्वी धक्कादायक व्हिडीओ देखील केला. ज्यामुळे भारताच्या नावाचाही समावेश होता.

या हल्लेखोराने हल्ला करण्याच्या अगोदर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये शस्त्रांवर लिहिण्यात आले होते की, ‘न्यूक इंडिया’ म्हणजे भारतावर परमाणू हल्ला करा. फक्त भारतच नाही तर अनेक देशांबद्दल अशाप्रकारचा मजकूर हा लिहिण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनाही मारून टाका, असेही लिहिण्यात आले. मुलांसाठी, तुमचा देव कुठे आहे? असेही बरेच त्याने लिहिले होते. आता हा संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

भारत आणि अमेरिकेत अगोदरच तणावाची स्थिती असताना असा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.  पोलिसांनी या प्रकरणानंतर गुन्हा दाखल केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्यावर मोठे भाष्य करत दु:ख व्यक्त केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला म्हणजे मानवतेवर हल्ला असल्याचे स्पष्ट शब्दात म्हटले. अमेरिकेतील या हल्ल्याची जगभरात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अनेकांनी या हल्ल्याची निंदा केली असून जखमींसाठी प्रार्थना केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यात दोन मुलांचा जीव गेलाय, त्यांचे वय 8 ते 10 वर्षाच्या आतमध्येच आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्लेखोर चर्चशी संबंधित एका शाळेतील माजी विद्यार्थी होता. 2017  पर्यंत तिथेच शिकला. मात्र, आपण ट्रान्सजेंडर असल्याचे त्याने जाहीर केले आणि त्याला कायदेशीररित्या त्याचे नाव बदलावे लागले. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध हा घेतला जात आहे.

Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?