AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं, इस्रायलचं विमानतळ उडवलं, ड्रोनने घडवून आणलेल्या स्फोटामुळे खळबळ

आता इस्रायल आणि येमेनमधील हुथी बंडखोरांत चांगलाच संघर्ष चालू आहे. हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या विमानतळावरच स्फोट घडवून आणला आहे. या घटनेनंतर आता हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जग हादरलं, इस्रायलचं विमानतळ उडवलं, ड्रोनने घडवून आणलेल्या स्फोटामुळे खळबळ
yemen israel war
| Updated on: Sep 07, 2025 | 11:23 PM
Share

Israel And Huti War : सध्या इस्रायल आणि हुथी बंडखोरांत टोकाचा संघर्ष सुरू आहे. येमेनधील हुथी बंडखोरांनी नुकतेच इस्रायलवर यशस्वी हल्ला केला आहे. या हल्ल्यात हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या विमानतळालाच लक्ष्य केलंय. येमेनच्या ड्रोनच्या मदतीने हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात इस्रायलमधील रामोन विमानतळाची मोठी नासधूस झाली आहे.

ड्रोन हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हुथी बंडखोरांनी केलेल्या या हल्ल्यानंतर या विमानतळाच्या कामात अडथळा निर्माण झाला. तसेच एअर ट्रॅफिकही थांबवण्यात आले. या अचानक केलेल्या हल्ल्यामुळे अनेक विमानांचे उशिरा उड्डाण झाले. विशेष म्हणजे हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये विमानतळाच्या परिसरात झालेला स्फोट आणि स्फोटानंतर निघालेला धूर स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्याबाबत नंतर इस्रायल सरकारनेही माहिती दिली आहे. या माहितीनुसार येमेनकडून डागण्यात आलेल्या चौथ्या ड्रोनमुळे रामोन विमानतळाचे नुकसान झाले. या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत, असे इस्रायलने सांगितले आहे.

चार ड्रोन हल्ले, एक हल्ला विमानतळावर

मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलवर येमेनमधून एकूण चार ड्रोन डागण्यात आले होते. यातील तीन ड्रोन हे इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिमने उद्ध्वस्त करून टाकले. मात्र चौथा ड्रोन रामोन विमानतळावर पडला आणि त्याचा स्फोट झाला. हुथी बंडखोरांनी केलेल्या या हल्ल्यांदरम्यान सायरन वाजले नाहीत. त्यामुळेच इस्रायलमधील लोक बंकरमध्ये लपू शकले नाहीत. येमेनमधून ड्रोन हल्ला होऊनही सायरन का वाजले नाही? याची आता चौकशी केली जाणार आहे.

आठवड्यापूर्वी इस्रायलने केला होता हल्ला

दरम्यान, याआधी इस्रायलने गेल्या आठवड्यात येमेनवर हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे आम्ही आता या हल्ल्याचा सूड घेऊ असे हुथी बंडखोरांनी ठरवले होते. तेव्हापासून हुती बंडखोरांकडून इस्रायवर हल्ले करण्यात येत आहेत. हुती बंडखोर इस्रायलशी संबंधित असलेल्या लाल समुद्रातील जहाजांनाही लक्ष्य करत आहेत. आता हा संघर्ष कोणत्या टोकाला जातो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.