
Benjamin Netanyahu Education: इस्त्रायलच्या राजकारणात बेंजामिन नेतन्याहू यांची मजबूत पकड आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांचा पक्ष सत्तेत आला आहे. जगभरात ओळख निर्माण केलेल्या नेतन्याहू यांचे टोपणनाव बीबी असे सुद्धा आहे. नेतन्याहू यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत रोचक आहे. त्यांची राजकारणातील एंट्री तितकीच विलक्षण आणि खास आहे. सध्या इराण-इस्त्रायल युद्धात नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या वार्ता येत आहेत. त्याविषयीची शंका उपस्थित करण्यात येत आहे. पण नेतन्याहू यांचे शिक्षण किती झाले हे तुम्हाला माहिती आहे का?
बेंजामिन नेतन्याहू यांचा राजकीय प्रवास
नेतन्याहू पहिल्यांदा जून 1996 मध्ये पंतप्रधान झाले. त्यांच्या कार्यकाळ हा 1999 पर्यंत सुरू होता. त्यानंतर ते 2009 मध्ये ते पुन्हा सत्तेत दाखल झाले. मधला मोठा काळ ते सत्तेच्या बाहेर होते. त्यानंतर जून 2021 पर्यंत त्यांचा देशावर एकछत्री अंमल होता. एका छोट्या ब्रेकनंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली. ते आजपर्यंत पंतप्रधान पदी कायम आहेत. त्यांनी सर्व कालावधी मिळून सर्वाधिक काळ इस्त्रायलच्या मुख्य पदावर काम करण्याचा दीर्घ अनुभव गाठीशी बांधला आहे. असे करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
इस्त्रायलच्या स्वातंत्र्यानंतर जन्म
नेतन्याहू यांचा जन्म सुरुवातीच्या पिढीतील आहे. इस्त्रायलच्या स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये जी पिढी जन्मला आली. त्यात नेतन्याहू यांचा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे आधुनिक वारशासह मागील पिढीचा अनुभवही आहे. नेतन्याहू हे इस्त्रायलच्या सर्वात घातक विशेष पथक सायेरेट मटकलचे(Sayeret Matkal) एक भाग होते. हे युनिट खास प्रकारच्या मोहिमांसाठी ओळखले जाते. त्यातून त्यांचे मजबूत व्यक्तिमत्व घडले.
नेतन्याहू यांचे शिक्षण काय?
नेतन्याहू यांनी अमेरिकेच्या प्रतिष्ठित Massachusetts Institute of Technology मधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी स्थापत्य शास्त्र आणि व्यवस्थापन पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी बोस्टन कन्सल्टिंग सारख्या समूहाच्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम केले आहे. नेतन्याहू हे प्रभावशाली इंग्रजी आणि दमदार भाषणासाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी अनेकदा संयुक्त राष्ट्र संघात इस्त्रायलचा पक्ष धडाडीने मांडला. त्यांच्या तडफदार आणि प्रभावी भाषणाची जोरदार चर्चा होते.