चिकटवणे की चिटकवणे ? योग्य शब्द कोणता ? तुम्हाला माहीत आहे का उत्तर; 99 %…
लाभते आम्हास भाग्य बोलतो मराठी…. हे गीत कानावर पडलं की ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच येतात, अभिमानाने मन फुलून येतं. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा झाली, तेव्हाही तमाम मराठी भाषिकांसाठी तोही एक अभिमानस्पद क्षण होता. रोजच्या जीवनात आपण मराठी बोलतो, लिहीतो वाचतो, पण काही वेळा त्यात हिंदी किंवा इंग्रजी शब्दांचा शिरकाव होतो. तर बऱ्याच वेळा […]

लाभते आम्हास भाग्य बोलतो मराठी…. हे गीत कानावर पडलं की ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच येतात, अभिमानाने मन फुलून येतं. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा झाली, तेव्हाही तमाम मराठी भाषिकांसाठी तोही एक अभिमानस्पद क्षण होता. रोजच्या जीवनात आपण मराठी बोलतो, लिहीतो वाचतो, पण काही वेळा त्यात हिंदी किंवा इंग्रजी शब्दांचा शिरकाव होतो. तर बऱ्याच वेळा एखादा शब्द आपण वापरतो खरा पण तोही चुकीच्या पद्धतीने.. गमतीची गोष्ट म्हणजे तो शब्द आपण चुकीचा वापरलाय की बरोबर हे अनेकांच्या गावीही नसतं. तरीही सगळेच जण वापरतात म्हणून आपल्याकडूनही त्या शब्दांचा वापर केला जातो. अनेकदा चुकीचे शब्दप्रयोग केले जातात, त्यातलाच एका शब्दाबद्दल अनेकदा गोंधळ होतो. तो शब्द म्हणजे चिकटवणे की चिटकवणे ?
अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो, पण बऱ्याच लोकांना यापैकी बरोबर शब्द कोणता आणि कोणता अयोग्य हे समजत नाही. भलेभले म्हणणारेही या शब्दाच्या वापराबद्दल कन्फ्युज होतात, गोंधळतात. चला तर मग जाणून घेऊया नक्की कोणता शब्द बरोबर ते…
चिकटवणे की चिटकवणे ?
मराठीमध्ये ‘चिटक’ असा शब्द आहे का हो ? शोधा तुम्ही.. असा शब्द नाहीये. मराठीत ‘चिकट’ असा शब्द आहे मात्र. त्या चिकट पासून ‘चिकटणे’ आणि ‘चिकटवणे’ असे दोन शब्द तयार होतात. म्हणजे जस आपण ‘मागव’ चं ‘मागवणे’ म्हणतो, ‘पाठव’ चं पाठवणे म्हणतो तसंच ‘चिकट’ याचं ‘चिकटवणे’ असा उच्चार होतो. हे इतकं सोपं आहे. काही मंडळी चिकट मधल्या क च्या जागी ट अशी अदलाबदल करून चिकटणेचा चिटकणे आणि चिकटवणे चा चिटकवणे असा शब्दोच्चार करतात. पण ते चूक आहे.
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना चुकीचा शब्द रेटून बोलायची सवय लागते, म्हणणं कळतंय ना ? काय फरत पडतो ? असं काही जण म्हणू शकतात. पण आपणचं जर असं करायला लागलो तर चुकीचे शब्द रूढ होऊ शकतात.पण त्याऐवजी पणच थोडीशी मेहनत घेतली , तर योग्य शब्दाचं अस्तित्व टिकून राहील, आपलं म्हणणंही पोहोचवेल आणि चुकीचा शब्द हळूहळू का होईना मागे पडेल. त्यामुळे शब्दांचा वापर करताना जपून आणि समजून करा.
त्यामुळे ‘वाट्टेल ते चिकटवू नका, जे योग्य आहे तेच चिकटवा आणि चिटकवू नका.’