AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलत्या हवामानामुळे तुम्हाला आळस येतोय, तर घरी बनवा ‘या’ 3 फ्लेवर्समध्ये कोल्ड कॉफी

पावसाळा ऋतू सुरू झाल्याने सर्वत्र थंडावा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकजण पावसाचा आंनद घेण्यासाठी बाहेर जात असतात. तर काहीजण पावसाचा आनंद घेत बदलत्या हवामानामुळे आलेले आळस दूर करण्यासाठी चहा कॉफी पित असतात. अशातच तुम्ही सुद्धा या बदलत्या हवामानात आळस दूर करण्यासाठी या 3 फ्लेवर्समध्ये कॉफी बनवून पिऊ शकतात.

बदलत्या हवामानामुळे तुम्हाला आळस येतोय, तर घरी बनवा 'या' 3 फ्लेवर्समध्ये कोल्ड कॉफी
| Edited By: | Updated on: Jun 30, 2025 | 7:46 PM
Share

आपल्यापैकी अनेकजण असे आहेत ज्यांना ऋतू कोणताही असो पण रोज कॉफी प्यायला खूप आवडते. बऱ्याचदा लोकांना कोल्ड कॉफी कॅफे मध्ये जाऊन प्यायला खूप आवडते. त्यातच कॅफेमध्ये मिळणारी कॉफी ही महाग असते, त्यामुळे रोज रोज जाऊन कॉफी पिऊ शकत नाही. तसेच ही कोल्ड कॉफी केवळ पोटातील उष्णता कमी करत नाही तर शरीरालाही थंड ठेवते. बरेच लोकं एकाच प्रकारे कोल्ड कॉफी बनवतात. दररोज तीच कोल्ड कॉफी पिणे थोडा कंटाळा देखील येतो. यासाठी तुम्ही कोणत्याही ऋतूत अनेक फ्लेवर्सची कोल्ड कॉफी बनवू शकता. यामुळे तुम्हाला एक नवीन चव तर मिळेलच, पण सर्वांना ती खूप आवडेल. तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला 3 फ्लेवर्सची कोल्ड कॉफीबद्दल सांगणार आहोत. तुम्ही ती तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी बनवू शकता, चला तर मग जाणून घेऊयात…

व्हॅनिला फ्लेवर्ड कोल्ड कॉफी

जर तुम्हाला गोड आणि क्रिमी कॉफी आवडत असेल तर व्हॅनिलापासून बनवलेली कोल्ड कॉफी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. ती बनवण्यासाठी, एक कप थंड दुधात एक चमचा इन्स्टंट कॉफी, दोन चमचे साखर, एक चमचा व्हॅनिला एसेन्स आणि बर्फाचे तुकडे मिसळा. आता हे सर्व मिश्रण मिक्सच्या भांड्यात एकत्र करा. काही मिनिटातच व्हॅनिला फ्लेवर्ड कोल्ड कॉफी तयार. ते एका ग्लासमध्ये काढा आणि चॉकलेटने सजवा.

चॉकलेट कोल्ड कॉफी आणि आईस्क्रीम

चॉकलेट कोल्ड कॉफी देखील खूप लोकप्रिय आहे. उन्हाळ्यात जास्त करून ही कॉफी प्यायली जाते. कारण ही कॉफी प्यायल्याने शरीराला ताजेतवाने वाटते. तर ही कॉफी बनवण्यासाठी, तुम्हाला दोन कप दुधात दोन चमचे कॉफी पावडर, एक चमचा पाणी, एक चमचा क्रीम, एक तुकडा डार्क चॉकलेट आणि एक स्कूप आईस्क्रीम मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून ग्राइंड करा. कॉफी तयार झाल्यावर आईस्क्रीम आणि चॉकलेटने सजवा आणि सर्व्ह करा.

कॅरमेल कोल्ड कॉफी

जेव्हा कोणी हॉटेल किंवा कॅफेमध्ये जाते तेव्हा तो नक्कीच कॅरेमल कोल्ड कॉफी ऑर्डर करतो. तुम्ही ती घरी देखील बनवू शकता. यासाठी, एक कप थंड दूध, एक टेबलस्पून इन्स्टंट कॉफी, दोन टेबलस्पून कॅरेमल सिरप, एक टेबलस्पून साखर आणि बर्फाचे तुकडे एकत्र मिक्सरच्या भांड्यात ग्राइंड करा. त्यानंतर ते एका ग्लासमध्ये काढा आणि वर कॅरेमल सिरप टाकून सजवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.