डिमार्टचा धमाका, एकाच वेळी तब्बल 20 टक्के सूट, ग्राहकांची झुंबड, थेट..

डिमार्टमध्ये मोठ्या सवलती ग्राहकांना मिळतात. शिवाय डिमार्टमध्ये कधीही खरेदीसाठी जा तिथे आपल्याला कायमच गर्दी मिळते. डिमार्टने आता मोठा निर्णय घेतला. डिमार्टकडून थेट ऑफर दिली जात आहे. तब्बल 20 टक्के सवलत देण्याचा निर्णय डिमार्टने घेतला.

डिमार्टचा धमाका, एकाच वेळी तब्बल 20 टक्के सूट, ग्राहकांची झुंबड, थेट..
DMart
| Updated on: Aug 03, 2026 | 4:29 PM

डिमार्टची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. डिमार्टमध्ये जाऊन खरेदी करण्याचा आनंद वेगळाच आहे. जवळपास लोक डिमार्टमध्ये जाऊन खरेदी करतात. डिमार्टमध्ये अगदी सवलतीच्या दरात वस्तू मिळतात. लोकांना वाटते की, अर्धा दिवस गेला तरीही चालेल पण महिन्याचे काम एकदाच होते आणि शिवाय पैशांची मोठी बचत डिमार्टमधील खरेदीमुळे होते. एकावर एक फ्री अशी मोठी ऑफर डिमार्टमध्ये असते. यामुळे एका वस्तूवर दुसरी वस्तू मोफतमध्ये मिळते. डिमार्टमुळे छोटे दुकानदार अडचणीत आल्याचा आरोपही केला जातो. मोठ्या महानगरांमध्येच डिमार्ट आहे. डिमार्टने बघता बघता मोठे शहर व्यापली आहेत. विशेष म्हणजे या महिन्यात रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनात लागणारे सर्व साहित्य डिमार्टमध्ये उपलब्ध होते. कोणताही सणवार असो त्याचे साहित्य डिमार्टमध्ये मिळते म्हणजे मिळतेच.

त्यामुळे लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच डिमार्टमध्ये जावे वाटते. खाण्यापिण्याच्या गोष्टींवर अधिक ऑफर डिमार्टमध्ये असतात. त्यामध्येच आता डिमार्टने मोठे पाऊल उचलले आहेत. हेच नाही तर ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी तब्बल 20 टक्के मोठी सवलत डिमार्टकडून दिली जातंय. घरगुती वस्तू, कपडे, किचनमध्ये लागणारे साहित्य, किराणा, विद्युत उपकरणे यांच्यासोबतच आता अजून महत्वाच्या गोष्टी डिमार्टमध्ये मिळणार आहेत.

डिमार्टमध्ये 5 ते 10 टक्के सवलत जवळपास वस्तूंवर मिळते. आता डिमार्टने मास्टर गेम खेळत तब्बल 20 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. डिमार्टने आता रिटेल फार्मसीकडे लक्ष वळवले आहे. फार्मसी क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले. त्यांनी थेट मोठ्या सवलतीसह नवीन मेडिकल फार्मसी काऊंटर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला. डिमार्टमध्ये स्टोअर्स प्रायोगिक तत्वावर फार्मसी काउंटर्स सुरू करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे डिमार्टकडून या फॉर्मसी कॉउंटरवर तब्बल 20 टक्के सवलत दिली जात आहे. आता डिमार्टकडून लवकरच सर्वच डिमार्टमध्ये फार्मसी काउंटर्स सुरू केले जाईल. तिथे एमआरपीपेक्षा अत्यंत कमी दरात औषधे विकली जाणार आहेत. काही शहरांमध्ये फार्मसी काउंटर्स सुरूही करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण थेट औषधे एमआरपीपेक्षाही कमी दरात मिळणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us