Indian Railway: काय ट्रेन पण होते रिटायर? जुन्या रेल्वेचे करतात काय? उत्तर आहे तरी काय?

Indian Railway Facts: भारतीय रेल्वे ही लाखो प्रवाशांसाठी वरदान आहे. कारण स्वस्तात इच्छित स्थळी पोहचण्याचे ते सुरक्षित माध्यम म्हणून मानले जाते. भारतीय रेल्वे आता कात टाकत आहेत. अनेक मोठे आणि नवीन बदल होत आहे. पण रेल्वे सुद्धा रिटायर होते का? जुन्या रेल्वेचे करतात काय?

Indian Railway: काय ट्रेन पण होते रिटायर? जुन्या रेल्वेचे करतात काय? उत्तर आहे तरी काय?
भारतीय रेल्वे
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 12, 2026 | 4:37 PM

Do You Know: प्रत्येक दिवशी लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. ट्रेन अनेक वर्षांपासून धावत आहेत. जेव्हा ट्रेन जुनी होते तेव्हा तिचे काय करतात? माणसांप्रमाणे ट्रेन सुद्धा निवृत्त होती का? किती वर्षे एका रेल्वेचा, तिच्या डब्यांचा वापर करण्यात येतो. का करण्यात येते रेल्वेला रिटायर? लाखो यात्रेकरूंना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणारी रेल्वे रिटायर होते म्हणजे काय होते?

किती वर्ष धावते रेल्वे?

साधारणपणे रेल्वे कोच जवळपास 25 ते 30 वर्षांपर्यंत धावतो. रेल्वेचे इंजिन हे त्याच्या देखरेखीनुसार चालते. जितकी देखरेख चांगली तितके ट्रेन अधिक काळ चालते. अर्थात रेल्वे इंजिन, रेल्वे रुळ, डब्ब्यांची वेळोवेळी देखभाल, दुरुस्ती करण्यात येते. पण सुरक्षेच्या दृष्टीने जुने डब्बे हटवणे आवश्यक असते. जुने डब्बे हटवले तर रेल्वेची गती वाढते आणि सुरक्षेची काळजी करावी लागत नाही.

ट्रेन आता निवृत्तीस आली हे कसे होते निश्चित?

रेल्वे वेळोवेळी ट्रेनची तांत्रिक तपास करते. या तपासात इंजिन, चाक, ब्रेक, रेल्वेची बॉडी आणि इतर भागांची सातत्याने तपासणी करण्यात येते. जर एखादी ट्रेन वारंवार खराब होत असेल. ती नादुरुस्त होत असेल तर तिची दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे अधिक खर्च टाळल्या जातो. जर ट्रेन अधिक खराब झाली तर मात्र तिला सेवेतून बाजूला करण्यात येते. याशिवाय नवीन तंत्रज्ञान आल्यावर जुने कोच बदलले जाते. भारतीय रेल्वे आता जुन्या ICF कोचाऐवजी आधुनिक आणि सुरक्षित LHB कोचचा वापर करण्यात येतो.

जुन्या ट्रेनचे काय काय होते.

जेव्हा एखादी ट्रेन रिटायर होते, तेव्हा ती थेट भंगारात काढली जात नाही. रेल्वे विभाग अगोदर हे निश्चित करते की रेल्वेचा डब्बा अथवा कोणता भाग पुन्हा उपयोगी येऊ शकतो. जो भाग पूर्णपणे खराब होतो, तो कापून भंगारात काढल्या जातो. त्यातून रेल्वेचा आर्थिक फायदा होतो. अनेक जुन्या डब्ब्यांना नवीन रुप देऊन रेल्वे ऑफिस, कँटीन अथवा ट्रेनिंग सेंटर वा कर्मचाऱ्यांच्या खोल्यांसाठी त्याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे एक नवीन लूक तर येतोच पण रेल्वेचा दुसरा चांगला उपयोगही होतो.

Follow Us