AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या वॉर्डरोबमध्ये आहेत का या 9 प्रकारच्या जीन्स? जाणून घ्या त्यांची नावे आणि वैशिष्ट्ये

फॅशनच्या जगात वेगवेगळ्या डेनिम जीन्सचा ट्रेंड सुरूच असतो. त्यामुळेच आज आपण अशाच 9 लोकप्रिय जीन्स प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक महिलेनं आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवायलाच हव्यात. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या लूकला अधिक ग्लॅमरस आणि ट्रेंडी बनवू शकता

तुमच्या वॉर्डरोबमध्ये आहेत का या 9 प्रकारच्या जीन्स? जाणून घ्या त्यांची नावे आणि वैशिष्ट्ये
| Edited By: | Updated on: Jun 30, 2025 | 7:02 PM
Share

फॅशनच्या दुनियेत ट्रेंड्स येतात आणि जातात, पण एक कपड्याचा प्रकार मात्र कायम हिट असतो तो म्हणजे डेनिम जीन्स. प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये एक तरी जीन्स नक्कीच सापडते. कारण जीन्स फक्त स्टाइलिशच नाही, तर आरामदायक, टिकाऊ आणि बहुपयोगीही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की जीन्ससुद्धा अनेक प्रकारच्या असतात? नाही तर मग अशा अनेक जीन्स प्रकारांबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

1. स्किनी जीन्स

ही जीन्स पूर्णतः टाइट असून ती पायाला चिकटून बसते. यासोबत फिटेड टॉप किंवा शॉर्ट कुर्ती उत्तम दिसते. स्लिम फिगरसाठी स्किनी जीन्स हा परफेक्ट पर्याय आहे.

2. स्लिम फिट जीन्स

स्किनी जीन्ससारखीच वाटणारी ही जीन्स हिप्स आणि थाईजवर फिट बसते, पण पायांकडे थोडी लूज असते. ती जास्त आरामदायक आणि डेलीवेअर म्हणून योग्य असते. कॅज्युअल लूकसाठी ही उत्तम निवड ठरते.

3. ओवरऑल जीन्स (डंगरी)

ही 90 च्या दशकातील लोकप्रिय स्टाइल पुन्हा फॅशनमध्ये परतली आहे. डंगरीसारखी दिसणारी ही जीन्स कोणत्याही कॉन्ट्रास्ट टॉपसोबत मस्त दिसते आणि तुम्हाला एक हटके लूक मिळतो.

4. स्ट्रेट फिट जीन्स

जांघेपासून पायाच्या टोकापर्यंत सरळ कट असणारी ही जीन्स कम्फर्टची कमाल आहे. ही ऑफिस, कॉलेज आणि पार्टी – सगळीकडे चालते. क्लासिक लूकसाठी बेस्ट!

5. जॉगर जीन्स

पायजमासारखी फिटिंग देणारी ही जीन्स हलकी आणि कंफर्टेबल असते. ती अधिकतर स्पोर्टी आणि युनिक लूकसाठी वापरली जाते. यासोबत कोणताही टॉप सहज मॅच होतो.

6. टू-टोन्ड जीन्स

दोन वेगवेगळ्या रंगांच्या कॉम्बिनेशनमध्ये मिळणारी ही जीन्स खूपच क्लासी दिसते. ती तुम्हाला ट्रेंडी आणि मॉडर्न लूक देते. ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये सहज मिळू शकते.

7. फ्लेयर जीन्स

ही जीन्स पायाकडे फ्लेअर्ड म्हणजेच घेर असते. क्रॉप टॉप, लूज टॉप किंवा कुर्ती यासोबत ती अफलातून दिसते. या स्टाइलची जीन्स पुन्हा एकदा युथमध्ये लोकप्रिय झाली आहे.

8. हाय-वेस्ट जीन्स

आजकाल बहुतेक मुली हाय-वेस्ट जीन्सची पसंती करतात. ती फिटिंगसोबतच पोट लपवण्यासाठी उपयोगी ठरते आणि शरीराला स्लिम लूक देते. टक इन टॉपसोबत ही स्टाईल धमाल दिसते.

9. बेल बॉटम जीन्स

पुरातन सिनेमांत दिसणारी ही बेल बॉटम जीन्स आता पुन्हा फॅशनमध्ये आली आहे. पायाकडे अधिक घेर असल्यामुळे ती व्हिंटेज आणि रेट्रो लूक देते. कॉलेज गोइंग मुलींमध्ये ही जीन्स खूपच हिट आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.