AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातलं सर्वात विषारी अन्न, लोकांना फारच आवडतं, एक घास खाल्ला तरी होतो सेकंदात मृत्यू!

या जगात असा एक खाद्यपदार्थ आहे, ज्याचे चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास थेट मृत्यू होऊ शकतो. याला जगातील सर्वात विषारी अन्नही म्हटले जाते. विशेष म्हणजे अनेक लोक हे अन्न आवडीने खातात.

जगातलं सर्वात विषारी अन्न, लोकांना फारच आवडतं, एक घास खाल्ला तरी होतो सेकंदात मृत्यू!
fugu dish
| Updated on: Nov 07, 2025 | 12:01 AM
Share

Most Poisonous Food : जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाल्ले जाते. काही ठिकाणचे पदार्थ पाहून तर आपण थक्क होऊन जातो. चीनसारख्या देशात तर साप, बेडुकही खाल्ला जातो. मात्र या जगात काही पदार्थ असे आहेत, ज्यात विष असते. म्हणजेच हे पदार्थ खाताना तुम्ही चूक केली तर तुमचा कदाचित जीवही जाऊ शकतो, असे सांगितले जाते. जगात असाच एक सर्वात विषारी पदार्थ आहे. हा पदार्थ काही मोजकेच लोक तयार करू शकतात. या पदार्थाला योग्य पद्धतीने तयान न केल्यास पुढच्याच काही मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

फुगू माशामुळे होऊ शकतो 30 जणांचा मृत्यू

कॅनडामधील इन्स्टिट्यूट ऑफ फुड सेफ्टीच्या रिपोर्टनुसार जपानमध्ये फुगू (Fugu) नावाचा एक मासा आहे. या माशापासून बनवलेला खाद्यपदार्थ सर्वाधिक विषारी मानला जातो. या फुगू माशाला पफरफिशही म्हटले जाते. या माशामध्ये टेट्रोडोटॉक्सिन नावाचा घटक आढळतो. फुगू या माशाचे अंडाशय, आतडे, फुफ्फुस यामध्ये टेट्रोडोटॉक्सिन हा घटक सर्वाधिक आढळतो. टेट्रोडोटॉक्सिन हा घटक न्युरोटॉक्झिन आहे. हा घटक सायनाईडपेक्षाही विषारी असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच एका फुगू माशामुळे तब्बल 30 लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे म्हटले जाते.

मास्टर शेफ यांनाच असते परवानगी

फुगू हा मासा विषारी असला तरीदेखील जपानमध्ये त्याचा आहारात समावेश केला जातो. मात्र या माशापासून प्रत्येकालाच खाद्यपदार्थ तयार करता येत नाहीत. त्यासाठी जपानी शेफला ट्रेनिंग दिले जाते. जपानमधील अनेक रेस्टॉरंट्समध्ये फुगू डिश दिले जाते. मात्र हे डिश तयार करण्याची परवानगी फक्त कुशल शेफ यांनाच असते. फुडू डिशला योग्य पद्धतीने न तयार केल्यास ते खाणाऱ्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने बनवलेल्या फुगू डिशमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत.

फुगू डिशची किंमत 20 हजार रुपये

दरम्यान, या फुगू डिशची किंमतही खूपच जास्त असते. या एका फुगू डिशची किंमत 3500 ते 20000 हजार रुपये असते. अनुभवी शेफच्या मदतीनेच हे डिश तयार केले जाते त्यामुळेच त्याची किंमत जास्त असते. जपानमध्ये काही प्रिमियम रेस्टॉरंट्समध्ये फुगू डिशची किंमत 35 हजार रुपयांच्या घरात आहे. फुगू डिश खायला फार चांगले लागते. त्यामुळेच अनेक लोक हे डिश खाणे पसंद करतात.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....