GK quiz: कोणत्या भारतीयाने ठेवले ‘पाकिस्तान’ हे नाव? हा अर्थ 99 टक्के लोकांना नाही माहीत

Who gave Pakistan Name: भारतातून विभक्त्त झालेला देश, कुरपतखोर, दहशतवादी देश, भीकेला लागलेला देश, भिकाऱ्यांचा देश, गाढवांची विक्री करणारा देश अशी अनेक विशेषणं पाकिस्तान या नावाशी जोडलेली आहे. पण या देशाला पाकिस्तान हे नाव दिलं कुणी?

GK quiz: कोणत्या भारतीयाने ठेवले पाकिस्तान हे नाव? हा अर्थ 99 टक्के लोकांना नाही माहीत
पाकिस्तान शब्दाचा अर्थ काय
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 22, 2026 | 3:54 PM

GK Trending Quiz: भारताचे 9 शेजारी देश आहेत. त्यात भारतातून फुटून तयार झालेला पाकिस्तान हा देश आहे. कुरपतखोर, दहशतवादी देश, भीकेला लागलेला देश, कर्जबाजारी देश, गाढवं विकणारा देश अशी अनेक विशेषणं पाकिस्तानसोबत जोडलेली आहेत. पण पाकिस्तान हे नाव कुणी दिलं हे तुम्हाला माहिती आहे का? हे नाव एका भारतीयानं दिले हे वाचून तुम्हाला धक्का बसेल. पण पाकिस्तान या शब्दाचा अर्थ समजला तर हे आतापर्यत आपल्याला कसं माहिती नव्हतं, असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.

‘पाकिस्तान’ हे नाव कोणत्या भारतीयाने दिले?

पाकिस्तान हे नाव चौधरी रहमती अली या भारतीयाने दिले. ते भारतातील पंजाब राज्यातील होते. ते इंग्लंडमध्ये केम्ब्रिज विद्यापीठाता कायद्याचे शिक्षण घेत होते. याच विद्यापीठात सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा, हे अजरामर कवी अल्लामा इकबाल हे सुद्धा शिकत होते. रहमत अली त्यावेळी मुस्लिमांच्या भविष्याविषयी चिंता करत होते. ब्रिटिशांनी फुटीरतेचे जे बीज सोडले होते. तेच विचार रहमत अली यांचे विचार होते. ‘चौधरी रहमत अली’ (Choudhary Rahmat Ali) यांनी 1933 मध्ये पाकिस्तान या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. त्यांच्या मनात हिंदुस्थानपासून स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राच्या निर्मितीचे वारे वाहत होते.

पहिल्यांदा पाकिस्तानचा उल्लेख केव्हा?

28 जानेवारी 1933 रोजी चौधरी रहमत अली यांनी एक बुकलेट प्रकाशित केले. त्याचे नाव “Now or Never: Are we to live or perish forever?” असे होते. त्यात त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली होती. त्यांनी या पुस्तकात पहिल्यांदा पाकिस्तान अशा नावाचे मुस्लिम राष्ट्र असावे असे सुचवले. तर पुढे “Pakistan: The Fatherland of the Pak Nation” असे एक पुस्तकही त्यांनी लिहिले. त्यात त्यांनी हा सर्व घटनाक्रम नोंदवला आहे.

पाकिस्तान हे नाव कसे झाले तयार?

स्टीफन फिलिप कोहेन यांच्यानुसार पाकिस्तान हे काही राज्यांच्या नावातील अद्याक्षरांसह एका प्रांतातील अखेरच्या शब्दांचा समुच्चय आहे. ज्या राज्यात मुस्लिम बहुसंख्याक होते. त्यांची सर्वाधिक संख्या होती. त्या प्रांताचा त्यांनी पाकिस्तान या नावासाठी विचार केला.
P – पंजाब

A – अफगानिया (सध्याचे खैबर पख्तूनख्वाह)

K – कश्मीर

S – सिंध

tan – बलूचिस्तान

ही नाव जोडून त्यांनी पाकिस्तान हे नाव तयार केलं. हा अर्थ अनेकांसाठी नवीन आहे. कारण पाक म्हणजे पवित्र असा एक अर्थ नेहमी सांगण्यात येतो. पण पाकिस्तान या नावामागील खरा अर्थ हा तिथल्या काही प्रांतामध्ये दडलेला आहे.

Follow Us