
आपण रोजच्या जगण्यात जेवण घेतो, ते आपल्या शरीराची ऊर्जा आणि आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की एक सामान्य माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यात नेमकं किती अन्न खातो? विशेषतः 60 वर्षांच्या कालावधीत. हा प्रश्न थोडा विचित्र वाटू शकतो, पण याचं उत्तर जरा धक्कादायक आणि गंमतीशीरही आहे.
रोजच्या जेवणाचा हिशेब 60 वर्षांवर गेला की, मानवी शरीराला चालण्यासाठी रोज अन्न लागते. काही लोक दिवसभरात 2 वेळा खातात, काही 3 वेळा, तर काही 4-5 वेळा थोडं-थोडं खाणं पसंत करतात. पण जेवढं खाल्लं जातं, ते जमा होतं आणि 60 वर्षांमध्ये त्याचं रूपांतर ‘टनांमध्ये’ होऊन जातं.
एका अंदाजानुसार, एक सामान्य माणूस आपल्या संपूर्ण जीवनात सुमारे 35 टन अन्न खातो. हो, चकित व्हाल, पण ही खरी माहिती आहे! 35 टन म्हणजे जवळपास 35,000 किलो अन्न. इतकं अन्न खाणं म्हणजे सुमारे 9 आशियाई हत्तींच्या वजनाइतकं! (एका हत्तीचं सरासरी वजन सुमारे 4,000 किलो धरलं जातं.)
जर आपण फक्त 60 वर्षांचा हिशेब लावला, तर 60 वर्षांमध्ये 21,900 दिवस होतात. आणि यामध्ये एखादा माणूस सरासरी 12,045 किलो अन्न खातो, म्हणजेच जवळपास 12 टन अन्न!
यात दैनंदिन जेवण, नाश्ता, पेय पदार्थ, फळं, दूध, मिष्टान्न, शिजवलेलं आणि न शिजवलेलं अन्न, तसेच द्रव स्वरूपातलं अन्नही धरलं जातं.
भारतात खाण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत कुणी चपात्या खातं, कुणाला भात आवडतो, कुणी शाकाहारी असतो, तर कुणी मांसाहारी. याशिवाय स्ट्रीट फूड आणि जंक फूडची तर येथे चंगळ आहेच! त्यामुळे खाण्याच्या प्रमाणात वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये फरक असतो. पण वरील अंदाज एका सामान्य भारतीयाच्या डाएटवर आधारित आहे.
हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जितक्या प्रमाणात अन्न घेतो, तितकंच बर्नही केलं पाहिजे. अन्यथा ते चरबीच्या रूपात साठू लागतं आणि मग वाढतं वजन, वाढतो त्रास! याचमुळे अनेक लोक आज मोटाप्याचं शिकार होतात.
शेवटी, आपल्या आयुष्यातील अन्नाचा हा हिशेब थोडा गंमतीशीर असला तरी शरीरासाठी अन्न किती आवश्यक आहे, याचं हे एक प्रभावी उदाहरण आहे. मात्र, योग्य प्रमाणात खाणं आणि शरीराला तितकीच हालचाल देणं ही खरी किमया आहे. कारण ‘जसा आहार, तसं आरोग्य’ हे शतकानुशतकांपासूनच खरं आहे.