चालत्या विमानात झोपी जातात पायलट, असते एक सिक्रेट रुम; झोपण्याचा नियम वाचून धक्काच बसेल!

एखादे विमान दहा ते बारा तास प्रवास करणार असेल तर वैमानिकांना आरामाची गरज असते. त्यामुळे वैमानिक विमानातच थेट झोपी जातात. त्यांना झोपण्याची काय सोय असते, असे हमखास विचारले जाते.

चालत्या विमानात झोपी जातात पायलट, असते एक सिक्रेट रुम; झोपण्याचा नियम वाचून धक्काच बसेल!
airplane and pilot
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2025 | 11:47 PM

विमानातून प्रवास करत असताना प्रवाशांचा सर्वाधिक विश्वास हा वैमानिकावर असतो. वैमानिक नियमांचे पालन करून दक्ष राहून विमान चालवेन असे गृहित धरूनच सर्व प्रवासी विमानात बसलेले असतात. हजारो फूट उंचीवर असताना विमान चालवणे हे काही साधारण असे काम नाही. विशेष म्हणजे जेव्हा विमान आठ, दहा ते बारा तास आकाशात असते तेव्हा वैमानिकाचा खरा कस लागतो. जेव्हा विमान बारा-बारा तास चालवावे लागते, तेव्हा वैमानिकाला थकवा येतो तेव्हा तोच वैमानिक चालत्या विमानात चक्क झोपतो. पण त्याच्या झोपण्याची खास सोय असते. ती नेमकी काय असते, ते जाणून घेऊ या…

वैमानिक नेमकं कुठं झोपतात?

वैमानिक नेहमी कॉकपिटमध्ये विमान चालवत बसलेले असता, असा अनेकांचा समज असतो. पण अनेकदा वैमानिकांना थकल्यासारखे वाटते किंवा कधी-कधी झोप येते. त्यामुळे वैमानिक विमानातच झोपी जातात. त्यांना आराम करम्यासाटी विशेष रेस्ट रुम किंवा क्रू रेस्ट अपार्टमेंट तयार करण्यात आलेला असतो. ही रुम प्रवाशांना सहजासहजी दिसत नाही. विमानातील क्रू मेंबर्स, वैमानिक यांनाच या रुमबाबत कल्पना असते. या रुममध्ये लहान बेड उपलब्ध असतात. याच रुममध्ये वैमानिक आराम करतात.

वैमानिकांना झोपी जाण्यासाठी कोणते नियम असतात?

वैमानिकांना विमानात आराम करण्यासाठी खास रुम असते. पण झोपण्यासाठी त्यांना खास नियमांचे पालन करावे लागते. लांब पल्ल्याच्या प्रवासावेळी विमानात दोन ते तीन वैमानिक असतात. अशा वेळी एक किंवा दोन वैमानिक कॉकपिटमध्ये विमानप्रवासावर लक्ष ठेवतात. अशा वेळी तिसरा वैमानिक आराम करतो. छोट्या विमानांत वैमानिकांना आराम करण्याची सुविधा नसते. पण अशा वेळी वैमानिकांना मर्यादित वेळेसाठी आराम करण्यास परवानगी असते. सर्व नियमांचे पलान करूनच वैमानिकांना अशा प्रकारचा आराम करता येतो.
एका वेळी केवळ एकच पायलट आराम करू शकतो. सोबतच रेस्ट करण्याआधी उर्वरित वैमानिकांची त्यासाठी संमती आवश्यक असते. आराम करून उठल्यानंतर वैमानिकांना लगेच विमान चालवण्यास सांगितले जात नाही. अगोदर पूर्णपणे फ्रेश झाल्यानंतरच वैमानिकाला विमानाचे कंट्रोल दिले जाते. दरम्यान, वैमानिक विमानात झोपतात हे जरी खरे असले तरी झोप घेण्याआधी पूर्ण नियमांचे पालन केले जाते. त्यामुळे यात घाबरून जाण्यासारखे काहीही नसते.