AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही झोपता, पण घरातील ही उपकरणे रात्रभर बिल वाढवतात, डोळे उघडणारी माहिती समोर

तुम्ही उपकरणे फक्त रिमोटने बंद करताय? सावध व्हा! स्टँडबाय मोडमुळे २४ तास होणारी विजेची चोरी आणि वाढते बिल रोखण्यासाठी वीज महामंडळाचा हा सोपा उपाय नक्की वाचा.

तुम्ही झोपता, पण घरातील ही उपकरणे रात्रभर बिल वाढवतात, डोळे उघडणारी माहिती समोर
electricity bill
| Updated on: May 22, 2026 | 1:12 PM
Share

तुम्ही घरातील टीव्ही, एसी किंवा इतर उपकरणे रिमोटने बंद करून वीज वाचवल्याचा आनंद घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बाहेरून पूर्णपणे बंद दिसणारी अनेक उपकरणे प्रत्यक्षात २४ तास सतत वीज वापरत असतात. या गंभीर समस्येकडे वीज महामंडळाने (Power Corporation) ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. नुकतंच वीज महामंडळाने सोशल मीडियावरील एका ट्वीटद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी ग्राहकांना विजेचे वाढते बिल कमी करण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे.

वीज महामंडळाचा सल्ला काय?

वीज महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, घरातील अनेक गॅझेट्स वापरून झाल्यावर आपण फक्त रिमोटने बंद करतो. अशा वेळी ही उपकरणे स्टँडबाय मोड (Standby Mode) मध्ये जातात. ग्राहकांना सुलभ आणि वेगवान अनुभव मिळावा म्हणून कंपन्या उपकरणांमध्ये हा मोड देतात. मात्र यामुळे स्क्रीन किंवा मशीन बंद दिसत असले, तरी अंतर्गत सर्किट्स चालू राहतात. त्यामुळे वीजेचा वापर सुरु राहतो. पण एका साध्या खबरदारीने म्हणजेच मुख्य स्विच (Main Switch) बंद करून तुम्ही या विजेच्या अनावश्यक अपव्ययाला आळा घालू शकता.

टीव्ही, सेटअप बॉक्स बंद करा

रिमोट कंट्रोलचा वापर करून टीव्ही बंद केल्यास त्याची केवळ स्क्रीन अंधारलेली राहते. टीव्ही प्रत्यक्षात पूर्णपणे बंद होत नाही. त्यामुळे टीव्ही बंद करताना नेहमी मुख्य बोर्डवरील पॉवर स्विच बंद करण्याची सवय लावावी. टीव्हीसोबत जोडलेला सेट-टॉप बॉक्सही बहुतांश वेळा २४ तास चालू स्थितीत असतो. टीव्हीप्रमाणेच हा बॉक्सही स्टँडबाय मोडमध्ये मोठ्या प्रमाणात वीज ओढतो. त्यामुळे टीव्ही बंद करताना सेट-टॉप बॉक्सचे मुख्य बटणही बंद करणे आवश्यक आहे.

चार्जर प्लगमध्ये ठेवू नका

मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज झाल्यावर अनेक जण त्याचा चार्जर प्लगमध्ये तसाच चालू ठेवतात. कोणतेही गॅझेट जोडलेले नसतानाही, सॉकेटमध्ये चालू असलेला चार्जर सतत वीज वापरत असतो. वापर संपताच चार्जर अनप्लग करणे हाच यावर उत्तम उपाय आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, एसी बंद करण्यासाठी केवळ रिमोटचा वापर केला जातो. परंतु, एसीमधील अंतर्गत सर्किटरी आणि सेन्सर्स स्टँडबाय मोडमध्ये कार्यरत राहतात. त्यामुळे एसी वापरून झाल्यावर मुख्य पॉवर स्विचवरून तो पूर्णपणे बंद ठेवावा.

राऊटर रात्री बंद करा

घरातील इंटरनेट राउटर एकदा चालू केला की तो महिनोनमहिने बंद केला जात नाही. जेव्हा इंटरनेटचा वापर नसेल, विशेषतः रात्री झोपताना किंवा घराबाहेर जाताना राउटर बंद ठेवल्यास विजेची मोठी बचत होऊ शकते. त्यासोबतच वॉटर प्युरिफायरची पाण्याची टाकी एकदा पूर्ण भरली, तरीही ते उपकरण स्टँडबाय मोडवर वीज घेत राहते. टाकीतील पाण्याची पातळी पुन्हा खाली येईपर्यंत आरओचे मुख्य बटण बंद ठेवणे फायदेशीर ठरते.

दरम्यान विजेचा हा छुपा वापर रोखण्यासाठी केवळ उपकरणांचे रिमोट न वापरता, मुख्य वीज बोर्डवरील बटण बंद करणे किंवा उपकरणांचे प्लग सॉकेटमधून बाहेर काढणे हाच एकमेव प्रभावी मार्ग आहे. या छोट्याशा सवयीमुळे तुम्हाला दर महिन्याला येणाऱ्या विजेच्या बिलात मोठी कपात करता येऊ शकते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा