AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आला रे आला आंब्याचा मौसम आला! नैसर्गिक आंबे आणि रासायनिक आंबे कसे ओळखणार?

बाजार आणि दुकानांमध्ये आंबा पाहायला मिळत आहे, हौशी लोक उत्साहाने खरेदी करत आहेत, पण सावध राहा. या हंगामात आंबा खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. कारण ते रसायने किंवा कार्बाइडने तयार केलेले असू शकतात.

आला रे आला आंब्याचा मौसम आला! नैसर्गिक आंबे आणि रासायनिक आंबे कसे ओळखणार?
how to find out best mangoesImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 12, 2023 | 12:41 PM
Share

आंब्याची चव कोणाला आकर्षित करत नाही? उन्हाळ्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्याचा हंगाम अजून पूर्णपणे आलेला नाही, पण बाजार आणि दुकानांमध्ये आंबा पाहायला मिळत आहे, हौशी लोक उत्साहाने खरेदी करत आहेत, पण सावध राहा. या हंगामात आंबा खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. कारण ते रसायने किंवा कार्बाइडने तयार केलेले असू शकतात. सहसा, बरेच व्यापारी जास्त नफा मिळवण्यासाठी रसायने आणि कार्बाइडचा वापर करतात. जर आपण ते खाल्ले तर ते शरीरासाठी हानिकारक आहे. ज्यामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे.

जर आंबा झाडावरून कच्चा तुटला असेल तर तो नैसर्गिकरित्या पिकवता येतो. यासाठी तुम्ही गरम ठिकाणी आंबा ठेवू शकता, जसं की पोती, भुस्सा असलेलं खोकं. पण त्यात कार्बन मोनॉक्साईड, ॲसिटिलीन वायू यांसारख्या गोष्टींचा वापर केल्यास ते धोकादायक ठरते. रसायनयुक्त आंबे खाल्ल्याने मज्जासंस्थेचे नुकसान होते, ज्यामुळे मेंदूचे नुकसान होऊ शकते, शिवाय त्वचेचा कर्करोग, कोलन कर्करोग, मज्जासंस्था, मेंदूचे नुकसान, गर्भाशयाचा कर्करोग आणि त्वचेचा कर्करोग यासारखे जीवघेणा आजार होऊ शकतात.

रासायनिक आंबे कसे ओळखावे?

  • आंब्याला वास घेऊन ओळखता येते, कार्बाइडने पिकवलेला आंबा असेल तर त्याचा तीव्र वास येईल.
  • असे आंबे खाल्ले तर ॲस्ट्रिंजंटची चव येईल, रसायन नसेल तर नैसर्गिक चव येईल.
  • आंबा केमिकलने पिकवलेला आंबा काही ठिकाणी पिवळा दिसेल, तर कुठे हिरवा दिसेल.
  • आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा असेल तर त्याचा रंग सगळीकडेच जवळजवळ सारखाच दिसतो.
  • रासायनिक आंबा कापला तर आत हिरवे किंवा पांढरे डाग दिसतात.
  • नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे पूर्णपणे पिवळे किंवा एकसारख्या रंगात दिसतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.