दररोज मद्यपान केल्यास किती दिवसांत डॅमेज होतं लिव्हर ? लक्षणं काय ?

जे लोक रोज दारू पितात, त्यांचे यकृत अर्थात लिव्हर लवकर खराब होतं. दारूमुळे लिव्हरवर अधिक परिणाम का होतो, असा प्रश्न उपस्थित होतो. याशिवाय लिव्हर खराब होण्याची लक्षणे कोणती ? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

दररोज मद्यपान केल्यास किती दिवसांत डॅमेज होतं लिव्हर ? लक्षणं काय ?
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 2:44 PM

Liver Damage : दारू पिणे आरोग्यासाठी हानीकारक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. जास्त दारू प्यायल्याने आपल्यावर शरीरावर विपरीत परिणाम होतो. तसेच यकृत अर्थात लिव्हरही लवकर खराब होते. अशा स्थितीत प्रश्न पडतो की दारूमुळे लिव्हरवर अधिक परिणाम का होतो ? तसेच जास्त मद्यपान केल्याने किती दिवसांत लिव्हर खराब होऊ शकते? आज याबद्दल जाणून घेऊया.

लिव्हर महत्वाचा अवयव

लिव्हर हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा लिव्हर खराब होतं तेव्हा शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. जर ते खराब झाले तर अनेक प्रकारचे गंभीर आजार तुमच्या शरीरात प्रवेश करू लागतात. त्यामुळे लिव्हर निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. जे लोक दररोज दारू पितात त्यांना फॅटी लिव्हरची समस्या वाढते. भारत आणि त्याच्या आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो. जरी आपण कमी दारू प्यायलो तर आपल्याला काहीही होणार नाही असे अनेकांना वाटत असते. पण दारू ही इतकी घातक गोष्ट आहे की त्याचा सर्वात आधी यकृतावर परिणाम होतो. याशिवाय अल्कोहोलमुळे शरीरात गॅस्ट्रिक ॲसिडही तयार होऊ शकते.

लिव्हरचं कार्य

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या म्हणण्यानुसार, अल्कोहोल पोटात प्रवेश करताच ते प्रथम गॅस्ट्रिक ॲसिड तयार करते. ज्यामुळे पोटाच्या श्लेष्माच्या रेषेत सूज येते. त्यानंतर आतडे अल्कोहोल शोषून घेतात. मग ते लिव्हरपर्यंत पोहोचते. पोटातून अल्कोहोल थेट लिव्हरपर्यंत पोहोचते. लिव्हर हे स्वतःच अल्कोहोल नष्ट करते. जेणेकरून त्याचा शरीरावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही, परंतु जे घटक लिव्हर नष्ट करू शकत नाहीत ते थेट मेंदूपर्यंत पोहोचतात. लिव्हर हे यकृत शरीरातील घाण डिटॉक्स करण्याचे काम करते. पण जर दारू दररोज शरीरात शिरली तर ते थेट लिव्हरला नुकसान पोहोचवू शकते. कारण हळूहळू लिव्हरची डिटॉक्सिफाय करण्याची, स्वच्छता करण्याची क्षमता कमी होत जाते. त्यानंतर लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ लागते. यानंतर, व्यक्ती फॅटी लिव्हर, नंतर लिव्हर सिरोसिस आणि शेवटी यकृताचा कर्करोग किंवा लिव्हर निकामी होण्याचा बळी ठरतो.

लिव्हर खराब होण्याची लक्षणं काय ?

पोट दुखणं आणि भूक न लागणं

ओटीपोटात दुखणे, अस्वस्थता किंवा ओटीपोटाच्या वरच्या उजव्या बाजूला सूज येणे, पोट फुगल्याची भावना हे फॅटी लिव्हर रोगाचे सामान्य लक्षण आहे. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने लिव्हरला सूज येऊ शकते, जी सतत अल्कोहोलच्या सेवनाने वाढते. यामुळे अल्कोहोलिक हेपेटायटीस होऊ शकतो. ज्यामुळे भूक न लागण्यासाठी लक्षणे दिसू लागतात. ,

थकवा आणि अतिसार

यकृतातील अतिरिक्त चरबीमुळे सूज येऊ शकते. जे प्रो-इंफ्लेमेटरी साइटोकिन्सला प्रोत्साहन देऊ शकते. या साइटोकिन्समुळे थकवा जाणवू शकतो. याशिवाय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यूएसच्या मते, सिरोसिसमध्ये लहान आतड्याच्या संसर्गास उशीर झाल्यास लहान जीवाणूंची वाढ होऊ शकते, ज्यामुळे अतिसार होऊ शकतो. याशिवाय रक्ताच्या उलट्या होणे, पायात सूज येणे, तापमान वाढणे आणि थरथरणे ही देखील लिव्हर खराब होण्याची लक्षणे आहेत. या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.