AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात डेंजर साप… एक थेंबाच्या विषाने झटक्यात होतो 100 जणांचा मृत्यू; तुम्हीही हैराण व्हाल

जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. पण हा एक साप जगातील सर्वात डेंजर साप म्हणून ओळखला जातो. हा साप इतका विषारी असतो की एक थेंबाच्या विषाने 100 जणांचा मृत्यू होऊ शकतो.

जगातील सर्वात डेंजर साप... एक थेंबाच्या विषाने झटक्यात होतो 100 जणांचा मृत्यू; तुम्हीही हैराण व्हाल
| Updated on: Dec 17, 2024 | 7:47 PM
Share

जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. यापैकी अनेक अत्यंत विषारी आहेत. तथापि, सर्वच साप धोकादायक नसतात. त्यापैकी केवळ 725 प्रजाती विषारी आहेत आणि त्यापैकी केवळ 250 प्रजातींचे साप मानवांसाठी प्राणघातक आहेत. तुम्हाला माहितीये का की जगातील सर्वात धोकादायक साप कोणता आहे ते.

साप म्हटलं की अंगावर काटा येतो.तुम्हाला माहितीय 725 प्रजाती विषारी आहेत. त्यातही जगातील धोकादायक आणि विषारी सापांपैकी केवळ 250 साप आहेत ज्यांच्या चावण्याने लोकांचा मृत्यू होऊ शकतो.मात्र काही बिनविषारी साप देखील कधीकधी प्राणघातक ठरू शकतात. पण यापैकी एक साप असा आहे जो जगातील सर्वात विषारी साप मानला जातो. या विषाचा एक थेंब 100 लोकांचा जीव घेऊ शकतो. या सापाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

इनलँड ताइपन, जगातील विषारी साप

इनलँड तैपन असे या सापाचे नाव आहे. हा प्रामुख्याने मध्य पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. हा जगातील सर्वात विषारी साप मानला जातो. इनलँड तैपन हा मोठ्या सापात गणला जातो त्याची सरासरी लांबी 6.5-9 फूट (2-2.7 मीटर) आणि वजन 3-4.4 पौंड असते.

एक थेंब 100 लोकांचा जीव घेऊ शकतो

या सापाच्या विषाचा एक थेंब जवळपास 100 लोकांचा जीव घेऊ शकतो. हा साप जर कोणाला चावला तर त्याचा जीव वाचणे कठीणच आहे.

‘या’ भागात आढळतो हा साप

या सापाल वेस्‍टर्न ताइपन किंवा इनलँड ताइपन असेही म्हणतात, हा जगातील सर्वात धोकादायक आणि विषारी साप मानला जातो. हा साप ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या मैदानी भागात आणि मातीच्या भेगांमध्ये आढळतात. तथापि, हा दुर्गम भाग असल्याने तिथे फार मानव वस्ती असल्याने या सापांनी माणसांची फार शिकार केलेलं कधी ऐकण्यात आले नाही.

हे साप अधिक विषारी का आहे?

इनलँड ताइपन क्वचितच माणसांच्या संपर्कात येतात. या सापांच्या विषामध्ये हाइलूरोनिडेज नावाचे एन्झाइम असते. तसेच इनलँड तैपनमध्ये न्यूरोटॉक्सिन आणि हेमोटॉक्सिन या दोन्हींचे विष असते. न्यूरोटॉक्सिनमुळे अर्धांगवायू होतो, तर हेमोटॉक्सिन टिशू अन् रक्तवाहिन्या नष्ट करतात, ज्यामुळे गंभीर अंतर्गत रक्तस्त्राव होतो.

या सापाचे विष एका चाव्यात 100 माणसांना मारू शकते. त्याची एकावेळी विष बाहेर टाकण्याची क्षमता ही 44-110 mg इतकी असते. ज्यामुळे हा साप चावल्यानंतर त्याचे विष लवकर पसरते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.