Interesting Facts: काय सांगता, कार-बाईकच नाही, ट्रेन पण देते मायलेज! फुल टाकी भरल्यावर धावते किती?

Interesting Facts: कार आणि बाईक खरेदी करताना आपण नेहमी ती किती मायलेज देते याकडे अधिक लक्ष देतो. कमी इंधनावर अधिक धावणारी वाहनं ही बाजारात लोकप्रिय असतात. कारण त्यामुळे खिशावरील ताण कमी होतो. असेच ट्रेनचे पण असते का? रेल्वेचा पण मायलेज तपासल्या जातो का? फुल टाकी भरल्यावर किती धावते रेल्वे?

Interesting Facts: काय सांगता, कार-बाईकच नाही, ट्रेन पण देते मायलेज! फुल टाकी भरल्यावर धावते किती?
Train Mileage
| Updated on: Mar 22, 2026 | 3:37 PM

Train Mileage: रेल्वे म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती लांबच लांब धावणारी गाडी येते. या रेल्वेतून दिवसभरातून लाखो लोक रोज प्रवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की रेल्वे सुद्धा कार आणि बाईकप्रमाणे मायलेज देते? ट्रेनचा पण मायलेज तपासल्या जातो. मायलेज तपासण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. कार आणि दुचाकीचे मायलेज तपासण्यासाठी ती किती किलोमीटर प्रति लिटर धावते हे माप वापरले जाते. म्हणजे एका लिटर पेट्रोल अथवा डिझेलमध्ये कार किती किलोमीटर जाते हे तपासले जाते. या वाहनाने कापलेले अंतरच मायलेज ठरवते.

एक लिटर डिझेलमध्ये किती धावते रेल्वे?

रेल्वे ही अनेक अवजड डब्यांना ओढते. रेल्वे एक मोठे इंजिन आणि अनेक डब्बे घेऊन प्रवासाला निघते. एक डिझेल ट्रेन सरासरी 4 ते 5 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत धावते. हा आकडा अगदी कमी वाटत असला तरी ती किती ओझे वाहून नेते हे महत्त्वाचे ठरते. ती एका माणसाला वाहून नेत नाही. तर हजारो प्रवासी आणि जड डब्बे रेल्वे इंजिनाला वाहून न्यावे लागतात. जर प्रत्येक प्रवाशांसाठी हे मायलेज विचारात घेतले. तर कार आणि बाईकपेक्षा ट्रेन अधिक मायलेज देते असे समोर येईल. म्हणजे या लाखो प्रवाशांचे एक युनिट, एक प्रवाशी गृहित धरला तर त्याच्यासाठी रेल्वे अत्यंत कमी इंधन खर्च करते.

ट्रेन हे सर्वात स्वस्त आणि सुविधाजनक साधन

ट्रेन हे दूरच्या प्रवासासाठी सर्वात स्वस्त आणि सुविधाजनक साधन मानल्या जाते. रेल्वे एका समान गतीने धावते. त्यामुळे इंजिनावरील इंधन भार कमी होतो. इंजिन अधिक क्षमतेने आणि एका पट्टीत धावत असल्याने त्याला कमी डिझेल लागते. ट्रेनमुळे अनेक गावं, शहरं जोडल्या जातात. देशातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी रेल्वेसारखं दुसरं कोणतंही चांगलं साधन मानल्या जात नाही. देशात रेल्वेचे दाट जाळं असून आता रेल्वे झपाट्याने रुपडं बदलत आहे. नव्या दमाच्या रेल्वेमुळे प्रवाशांना कमी वेळेत झटपट एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहचता येत आहे. वंदे भारत, हायस्पीड आणि इतर ट्रेनमुळे प्रवास अधिक जलद होत आहे.

Follow Us