AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीने केली कमाल 38 किलो वजन थेट केले कमी, फक्त सोडली ही एक गोष्ट..

वजन कमी करणे हे एक मोठे आव्हान वाटू शकते आणि त्यासाठी अनेकजण डाएटचा आधार घेतात. मात्र, भाजप नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी 38‍ किलो वजन कमी करण्यासाठी जपानी प्लेटची ट्रिक वापरली आहे. चला जाणून घेऊयात जपानी प्लेट ही पद्धत नेमकी काय आहे.

अभिनेत्रीने केली कमाल 38 किलो वजन थेट केले कमी, फक्त सोडली ही एक गोष्ट..
Khushbu Sundar
| Updated on: Aug 20, 2026 | 9:44 AM
Share

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकजण वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी काहीजण जिम, कठोर डाएट किंवा महागड्या सप्लिमेंट्सचा आधार घेतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी नेहमीच स्वतःवर अतिरिक्त मानसिक ताण घेण्याची गरज नसते. योग्य आहार, संतुलित जीवनशैली आणि काही प्रभावी ट्रिक्सच्या मदतीनेही वजन कमी करता येते. त्यातच भाजप नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी जपानी प्लेट ट्रिकच्या मदतीने 98 किलो वजनावरून तब्बल 38 किलो वजन कमी केल्याचं त्यांनी सांगितले आहे. वाढलेल्या वजनामुळे त्यांना बसताना आणि उभे राहताना त्रास होत होता, तसेच गुडघेदुखीचाही सामना करावा लागत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना गुडघ्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. मात्र शस्त्रक्रियेचा सल्ला मिळाल्यानंतर खुशबू सुंदर यांनी वजन कमी करण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी आहारात काही महत्त्वाचे बदल करत जपानी प्लेट ट्रिक या वजन कमी करण्याच्या एका सोप्या पद्धतीचा अवलंब केला.

वाढत्या वजनाचा त्रास; गुडघ्याच्या शस्त्रक्रियेपर्यंत आली वेळ

वाढते वजन केवळ शरीराचा आकार बदलत नाही, तर त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर आणि आरोग्यावरही होऊ शकतो. अभिनेत्री आणि भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनाही वाढलेल्या वजनामुळे अशाच अडचणींचा सामना करावा लागला होता.

2019 मध्ये रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटासाठी त्यांचे वजन अंदाजे 98 किलो झाले होते. वाढलेल्या वजनामुळे चालताना, पायऱ्या चढताना त्यांना त्रास जाणवू लागला. त्यातच गुडघेदुखी वाढल्याने डॉक्टरांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला. वजन कमी न केल्यास गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करावी लागू शकते, असेही त्यांना सांगण्यात आले.

ही परिस्थिती खुशबू सुंदर यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. त्यानंतर त्यांनी वजन कमी करण्याचा निर्धार केला. पण त्यांनी यासाठी कोणता कठीण मार्ग निवडला नाही. उलट आहाराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी प्रभावी जपानी प्लेटची ट्रिक्स अवलंबली आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत झाली.

जपानी प्लेट ट्रिक नेमकी काय आहे?

नाव ऐकून ही काही अवघड पद्धत वाटू शकते, पण प्रत्यक्षात ही अतिशय सोपी ट्रिक्स आहे. या पद्धतीमध्ये मोठ्या ताटाऐवजी तुलनेने लहान ताटाचा वापर करून जेवणाचे प्रमाण नियंत्रित करण्यावर भर दिला जातो.

लहान ताटात मर्यादित प्रमाणातील अन्न ठेवले तरी ताट भरलेले दिसते. त्यामुळे कमी प्रमाणात अन्न घेतल्यानेही मेंदूला संकेत मिळतो की तुम्ही पोटभर जेवत आहात. याउलट मोठ्या ताटात तेवढेच अन्न ठेवले तर ते कमी दिसते आणि अधिक घेण्याची इच्छा होऊ शकते. त्यामुळे ही ट्रिक्सचा अवलंब करत खुशबू सुंदर यांनीही अन्नाचे प्रमाण कमी करण्यावर आणि पोषक पदार्थ निवडण्यावर लक्ष केंद्रित केले.

आहारात केले महत्त्वाचे बदल

वजन कमी करण्याच्या प्रवासात केवळ किती खाल्ले हेच नव्हे, तर काय खाल्ले यालाही महत्त्व आहे. खुशबू सुंदर यांनी आपल्या आहारात बदल करत पोषणावर लक्ष केंद्रित केले आणि जेवणाचे प्रमाण नियंत्रित केले. त्यांना ग्लूटेनची ॲलर्जी असल्याने रिफाइंड पीठ आणि गहू यांसारखे पदार्थांचे सेवन टाळण्यास सुरुवात केली. या पदार्थांमुळे पोट फुगण्याचा त्रास व्हायचा. त्यांचे वजन अनेकदा कमी होऊन पुन्हा वाढत असे. त्यामुळे वजनातील या चढ-उतारामागचे कारण समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्वतःच्या वाढत्या वजना मागचा चुका ओळखून त्यातून शिकत त्यांनी आहार आणि दिनचर्येत सातत्य ठेवण्यावर भर दिला.

जिम नाही, महागडे सप्लिमेंट्सही नाहीत

वजन कमी करण्यासाठी प्रत्येकाने जिममध्येच जावे किंवा महागडी सप्लिमेंट्स घ्यावी लागतात, असे नाही. खुशबू सुंदर यांनी वजन कमी करण्याच्या प्रवासात योगा करणे आणि चालणे यावर लक्ष केंद्रित करत त्यांनी नियमित योगाभ्यास आणि चालण्यास सुरुवात केली. आहाराचे प्रमाण नियंत्रित करणे, पोषक पदार्थांवर लक्ष देणे आणि सातत्य ठेवणे या गोष्टींवर त्यांनी भर दिला. खुशबू सुंदर यांच्या मते चवीसाठी खाऊ नका तर भूक आणि शरीराची गरज लक्षात घेऊन खा.

जपानी प्लेट ट्रिक ही वजन कमी करण्याची कोणतीही वैद्यकीय उपचारपद्धती नाही. वजन कमी करण्यासाठी आहारातील मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?