AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shweta Tiwari: कोल्ड ड्रिंक मागवलं अन् सोबत झुरळ आलं; श्वेता तिवारी संतापली, तुकाराम मुंढेंना टॅग करत म्हणाली..

Shweta Tiwari: एका साध्या डिलिव्हरीतून समोर आलेल्या या घटनेनं मात्र अन्नपदार्थांची स्वच्छता, पॅकेजिंग आणि डिलिव्हरीपूर्वीची तपासणी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. श्वेता तिवारीच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Shweta Tiwari: कोल्ड ड्रिंक मागवलं अन् सोबत झुरळ आलं; श्वेता तिवारी संतापली, तुकाराम मुंढेंना टॅग करत म्हणाली..
श्वेता तिवारी आणि तुकाराम मुंढेImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 20, 2026 | 9:27 AM
Share

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून राज्यात धडक कारवायांचं सत्र सुरू आहे. नागरिकसुद्धा आपल्या समस्या व्यक्त करण्यासाठी त्यांना सक्रियपणे टॅग करत आहेत. अशातच टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कोल्ड ड्रिंकची ऑर्डर केल्यानंतर त्यासोबत तिच्या घरात चक्क झुरळ पोहोचल्याचा दावा श्वेताने केला आहे. या प्रकारानंतर तिने इन्स्टा स्टोरीमध्ये व्हिडीओ शेअर करत थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केलं आहे. श्वेता तिवारीने ‘इन्स्टा मार्ट’वरून कोल्ड ड्रिंक्स मागवले होते. मात्र या कोल्ड ड्रिंक्ससोबतच झुरळ आल्याची माहिती तिने या व्हिडीओमध्ये दिली आहे.

श्वेताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या घरात फिरणारं झुरळ दिसत आहे. ऑर्डर केलेल्या वस्तू दाखवत असताना तिने या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कोल्ड ड्रिंक्ससोबत झुरळही घरात आल्याचं सांगत तिने या घटनेची माहिती आपल्या फॉलोअर्सना दिली. या क्लिपमध्ये ती म्हणतेय, “मी इन्स्टा मार्टवरून रेड बुल मागवलं होतं. या ऑर्डरसोबत आमच्या घरात कॉक्रोचसुद्धा आलं. हा कॉक्रोच संपूर्ण घरात इथे-तिथे पळतोय. आम्ही तुकाराम मुंढे यांना टॅग करावं का? इन्स्टा मार्टवरून आमच्या घरात कॉक्रोच येत आहेत. तुम्ही कुठे आहात? कृपया याकडे लक्ष द्या.”

पहा व्हिडीओ-

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित कारवायांमुळे चर्चेत आहेत. एफडीए आयुक्त म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली विविध खाद्य व्यवसाय, रेस्टॉरंट्स आणि क्विक कॉमर्सशी संबंधित ठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत. अन्नाच्या दर्जाबरोबरच स्वच्छतेच्या नियमांचं पालन होतंय की नाही, यावरही प्रशासनाकडून लक्ष दिलं जात आहे. यामुळेच श्वेता तिवारीने तुकाराम मुंढेंना टॅग करत याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. तिच्या या पोस्टमुळे ऑनलाइन फूड आणि डिलिव्हरी सेवांमध्ये स्वच्छतेचे नियम कितपत पाळले जातात, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणा या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. ‘बिग बॉस 4’ची विजेती ठरलेल्या श्वेताने अनेक मालिकांसोबतच रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?