AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदार राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांवर जिव्हारी लागणारा वार; एका वाक्यात खूप काही बोलून गेले

भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांवर तिखट वार केला आहे. राऊतांनी रोहित पवारांचं वय काढत जोरदार हल्ला केला.

भाजप आमदार राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांवर जिव्हारी लागणारा वार; एका वाक्यात खूप काही बोलून गेले
Rajendra raut newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 10:39 AM
Share

भाजप आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार रोहित पवारांमध्ये वाकयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित पवारांच्या टीकेला आता भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी माझ्या उंचीच्या नेत्यांवर बोलतो, बाकीच्यांवर बोलण्यासाठी पाचवीचा पोरगा प्रवक्ता म्हणून ठेवलाय, अशा शब्दात आमदार राजेंद्र राऊत रोहित पवारांना डिवचलं आहे. त्यानंतर राजेंद्र राऊतांनी रोहित पवारांचं वय काढलं. राजेंद्र राऊत यांनी जिव्हारी लागणारा वार केल्यानंतर रोहित पवार काय प्रतिक्रिया देतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

आमदार राजेंद्र राऊतांकडून रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं. राजेंद्र राऊत यांनी म्हटलं की, पिल्लू रोहित बाळाला फार खूमखुमी आहे. स्वतः मोठा नेता म्हणून घेण्याची विकृती लागली आहे. रोहित पवारांचं जेवढं वय आहे, तेवढा आमचा संघर्ष आहे. सर्वसामान्यांची मुलं मोठ्या पदावर गेले की पवारांच्या पोटात दुखते.  रोहित पवारांचे वडील म्हणतात, आमचा रोहित चिंचा आणि बोरं विकत होता, मग आता सोनं विकतोय का?  राज्यात अराजकता माजवण्याची सुपारी रोहित पवारांनी घेतली. उठ सूट मुझे गिनो अशी त्यांची अवस्था आहे’.

‘रोहित पवार आणि त्यांच्या घराण्याची पात्रता काय आहे? आमचे घराणे शिवाजी महाराजांच्या सैन्यदलात लढलेले आणि रक्त सांडलेला आमचा इतिहास आहे. तुमचे घराणे नेहमी गद्दारी केलेले आणि शिवाजी महाराजांसमोर देखील झुकत नाहीत. कोणाला तरी वाईट वाटेल म्हणून तुम्ही कधी शिवजयंती साजरी केली नाही. मुळात दुष्काळाला जबाबदार पवार कुटुंब आहे. त्यामुळे रोहित पिल्लू जास्त शहाणपणा करू नका आणि बार्शीत राऊतांचा नाद करू नका, असा इशारा राऊत यांनी दिला.

नौटंकीसाठी रोहित पवार बार्शीत, राऊतांची जहरी टीका 

राजेंद्र राऊत पुढे म्हणाले, पहिल्यापासून तुम्ही बार्शीत राजकारण केलं. जिल्हा, राज्यात राजकारण केलं. बार्शीत माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या खानदानाला कधी आरी गेला नाही. त्यामुळे नौटंकी करण्यासाठी बार्शीला आला. प्रचाराला आल्यानंतर समोर किती लोक होती? तुम्हाला मतदान किती होती? हात वर करा, शिक्षक मतदार किती आहेत? एक तरी बोट वर झालं का? पदवीधरमधून किती? 5-6 जणांनी हात वर केले. जिथे कॉलेजचा परिसर आहे. तिथे नेहमी 200-300 मुलं त्या ठिकाणी असतात. तुम्हाला कोणत्या शाळेत तरी येऊ दिलं का, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.

Follow Us
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!