AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ujjwal Nikam : कसाबला पहिल्यांदा पाहिल्यानंतर संतापलेले उज्ज्वल निकम! स्पष्टच म्हणाले…

Ujjwal Nikam : सरकारी वकील उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) यांनी अनेक गुन्हेगारांना शिक्षा दिली, ज्यामुळे पीडितांना न्याय मिळाला. तर 26/11 प्रकरणात देखील असंच झाली, उज्ज्वल निकम यांनी कसाबच्या विरोधात बाजू मांडली आणि त्याला फाशीपर्यंत पोहोवलं. अशात जेव्हा उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा कसाबला पाहिलं, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी होती, यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं...

Ujjwal Nikam : कसाबला पहिल्यांदा पाहिल्यानंतर संतापलेले उज्ज्वल निकम! स्पष्टच म्हणाले...
Ujjwal Nikam
| Updated on: Oct 21, 2026 | 10:32 AM
Share

Ujjwal Nikam : 26/11 ती रक्तरंजित रात्र, मुंबईच्या काळजात झाडलेल्या त्या दहशतीच्या गोळ्या, अनेकांनी गमावलेले प्राण… दहशतवाद्यांचा तो अमानुष चेहरा आणि मुंबईकरांच्या धौर्याच्या कहाणीवर अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. पण दहशतवादी कसाब याला फासावर पोहोचवण्यापर्यंत कोर्टात काय काय घडलं, हे ‘प्रहार’ सिनेमातून समोर आलं आहे. 26/11 प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) यांनी कसाबच्या विरोधात बाजू मांडली. अशात कसाब याला पहिल्यांचा पाहिल्यानंतर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया कशी होती? असा प्रश्न अनेकांनी उज्ज्वल निकम यांना विचारला… यावर उज्ज्वल निकम यांनी एका मुलाखतीत उत्त दिलं.

प्रश्नाचं उत्तर देत उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोणत्याही गुन्हेगाराला पाहिल्यानंतर मला संताप येत नाही. कारण संताप आल्यानंतर मी काम करु शकणार नाही. मी त्या गुन्हेगाराला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने का गु्न्हा केला, त्यामागची पार्श्वभूमी काय? कारण परमेश्वर जन्माला घालताना प्रत्येकाला गुन्हेगार बनवत नाही. त्यामागे परिस्थिती असते. जन्मतः गुन्हेगार कोणीच नसतं, पण ही गुन्हेगारी प्रवृत्ती केव्हा आणि का निर्माण झाली, त्याच्यापासून तो कधी दूर गेलाय का? हे महत्त्वाचे प्रश्न असतात आणि या प्रश्नांचा अभ्यास करणं एका वकिलाला फार गरजेचं असतं.

पुढे उज्ज्वल निकम म्हणाले, ‘हा आभ्यास झाल्यानंतर तुम्हाला माझी दोन रुपं पाहायला मिळतील, एक म्हणजे आम रुप, त्यामध्ये गुन्हेगाराशी बोलताना, ‘क्या रे कैसे चल रहा है… सब ठिक ना…’ जसं काही मी त्याचा बाप आहे मोठा डॉन जेल मधला… मी अशा गप्पा मारतो… म्हणजे मला त्यांना असं सांगायचं असतं की, ‘मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, जास्त गडबड करायची नाही.’

दुसरं रुप सांगत उज्ज्वल निकम म्हणाले, ‘दुसरा युक्तीवादाच्या वेळेला एरवी मी कोणाचा वैयक्तीक शत्रू कधीच नसतो, मी रागावतो देखील कारण लोकांकडून कामं करुन घ्यायची असतात. माझे पोलीस अधिकारी, सुरुवातील मी त्यांना फार कठोर वाटतो. पण नंतर त्यांना कळतं की, आपल्यात प्रगती होण्यासाठी असतं. पोलीस अधिकाऱ्यांची तर मला नेहमी गरज भासते. ‘प्रहार’ सिनेमात माझा फक्त चेहरा आहे, पण त्यामागे पोलिसांची जी मेहनत आहे.. जे आमचं संबिधान आहे, संविधानाने काय केलं… हे सर्व ‘प्रहार’ सिनेमात पाहायला मिळेल…’ असं देखील उज्ज्वल निकम निकम म्हणाले.

Follow Us
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!