AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या बॉम्बने राजकारण तापलं; रोहित पवार मोजक्या शब्दात बोलले, म्हणाले…

मनोज जरांगे यांच्या 500 कोटींच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आता रोहित पवारांनी देखील पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या बॉम्बने राजकारण तापलं; रोहित पवार मोजक्या शब्दात बोलले, म्हणाले...
rohit pawar newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 8:17 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटींचा बॉम्ब टाकला आहे. जरांगे यांच्या आरोपाने सत्ताधारी आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जरांगेंच्या 500 कोटींच्या बॉम्बवरून रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली. या आरोप-प्रत्यारोपापेक्षा राज्यातील दुष्काळाची समस्या मोठी असल्याचे त्यांनी म्हटलं.

रोहित पवार सध्या पधवी निवडणकीमुळे परभणीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर राज्यातील सर्व घडामोडींवर भाष्य केलं. मनोज जरांगेंच्या आरोपावर रोहित पवार म्हणाले, ‘आरोप प्रत्यारोप चाललेत, यापेक्षा दुष्काळावर चर्चा होणं महत्त्वाचं आहे.  आम्ही सध्या त्यावरच चर्चा करत आहोत. यांनी किंवा त्यांनी एकमेकांवर काय टीका केली, यापेक्षा ग्रामीण शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली, यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे’.

एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर रोहित पवार म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांनी मेळावा शेतकऱ्यांना समर्पित न करिता प्रति हेक्टरी 1 लाख रुपये मदत समर्पित करा. शेतमजुरांना प्रति 25 हजार रुपये ससर्पित करा. बचत गटाच्या माध्यमातून अडचणी झालेल्या महिलांची कर्जमाफी करा. विद्यार्थ्यांनी घेतलेले शैक्षणिक कर्ज माफ करा. त्यांची वार्षिक फीस रद्द करा. तुम्ही सत्तेत आहात. सभा किंवा कार्यक्रम समर्पित करण्यापेक्षा सामान्य लोकांना मदत करा. आज सरकारने शेतकरी शेतमजुराने ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे’.

ग्रामीण भागातील लोकांच्या स्थलांतरवर रोहित पवार म्हणाले, ‘भीती अशी आहे की, 40% लोक स्थलांतर करून ग्रामीण भागातून शहरी भागात जातील, ज्या जनावरांची किंमत 80 ते एक लाख रुपये होते. त्यांना 40 -40 हजारात जनावरे विकावी लागत आहेत. स्थलांतरणाचा मुद्दा अतिशय गहन आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्याला एक लाख रुपये द्या. मजुराला 25हजार मदत द्या. नागरिकांना प्यायला 20 लिटर पाणी देत आहात. तिथे प्रति व्यक्ती 40 लिटर पाणी द्यावे लागेल. जनावरांसाठी वेगळी पाण्याची सोय करावी लागेल. डीबीटीमधून चाऱ्याची सोय करणं महत्त्वाचं आहे. अन्यथा ग्रामीण भागासारखीच शहरी भागात सुद्धा परिस्थिती निर्माण होईल’.

रेजीम चेंजवर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रेजीम चेंजवर रोहित पवार म्हणाले, ‘अघोषित आणीबाणी या देशात आणि महाराष्ट्रात तुम्ही आणली असेल. तर पोलीस योग्य पद्धतीने काम करत नसतील आणि कायदा व अशी व्यवस्थित वाट देशात आणि राज्यात लागली असेल. संविधानाची पायमल्ली सुरू असेल, शेतकरी शेतमजूर विद्यार्थी महिला या सगळ्याच लोकांवर देशाचा न्याय होत असेल, तर रिजिम चेंज होणार असेल. तर सरकारला बदलून टाका. सत्ताधारी काय बोलतात यापेक्षा लोकांची इच्छा झाली की सत्य लोकांना बाहेर काढायचं आणि देशात आणि राज्यात रयतेचे राज्य किंवा सामान्य लोकांच राज्य या देशात आणि राज्याचा आणायचंय’.

रोहित पवार यांनी संजय राऊत यांनी अमित शहांवर केलेल्या टीकेचं समर्थन केलं. ‘केंद्रात गृहमंत्री असताना एवढे ताकतवान मिनिस्टर असताना जेव्हा तिरंगा घेऊन शांततेत आंदोलन करणाऱ्या तुम्ही जेलमध्ये टाकता. दोन लाख पोलीस आणि सैन्य हे सामान्य लोक रस्त्यावर येणार आहेत म्हणून तुम्ही तिथे आणता. तर दुसरीकडे महाराष्ट्रात सामान्य व्यक्ती कलाकार आणि राजकीय व्यक्तींवर गोळ्या झाडल्या जातात. त्यामुळे अशा परिस्थितीत या गुंडांना पाठिंबा केंद्रीय गृह मंत्रालयाचा आहे. राज्यातील गृह मंत्रालयाचा आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा असेल, तर जे काही गुंडांची नावे घेतली जातात, तेच सत्ताधारी आहेत. असं म्हणायला हरकत नाही’.

पदवीधर निवडणुकीवर रोहित पवार म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवाराची भूमिका उद्या किंवा परवा बदलेल असं आम्हाला वाटतं. कारण सुप्रिया सुळे या उद्धव ठाकरेंशी बोलत आहेत. चर्चा करत आहेत. एक-दोन दिवसात ही परिस्थिती स्पष्ट होईल. मात्र महाविकास आघाडीतील सगळे पदाधिकारी नेते हे आमच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत. वातावरण चांगलं आहे एकूण मतदानांपैकी 80 टक्के मतदान हे प्रताप पाटील यांना होईल असा विश्वास असल्याचं रोहित पवार म्हणाले. घरातले उमेदवार यांनी 2024 ला हार मानली होती म्हणून ते गंगापूरमधून निवडणुकीला उभे होते. त्यामुळे जी व्यक्ती आधीच हार मानते, त्या व्यक्तीच्या मागे महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लोक उभी राहत नाहीत. त्यामुळे प्रताप पाटील खूप मताने निवडून येतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!