AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा, दिवाळीआधी…दसरा मेळाव्यात थेट सांगून टाकलं!

शेतकऱ्यांना आम्ही दिवाळीचा शिधा देण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या एकही दिवस मला शिवा दिल्याशिवाय जात नाही. ते आमच्यावर टीका करतात. आम्ही कामातून उत्तर देत आहोत, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला.

Eknath Shinde : शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा, दिवाळीआधी...दसरा मेळाव्यात थेट सांगून टाकलं!
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 9:06 PM
Share

Eknath Shinde Speech : गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिंदे यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यातील सध्याच्या दुष्काळावर सविस्तर भाष्य केलं. आम्ही शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे शिंदे यावेळी म्हणाले. तसेच शिंदे यांनी यावेळी महत्त्वाची घोषणा केली. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न लावून देण्याची जबाबदारी शिवसेनेची असेल, अशी मोठी घोषणा केली. यावेळी भर भाषणातच त्यांनी शिवसेनेच्या खासदार, आदमारांना लग्न असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीच्या नावांची यादी तयार करण्याचा आदेश दिला.

बाळासाहेब, आनंद दिघे असते तर…

एकनाथ शिंदे करून दाखवणारा माणूस आहे. सध्या राज्यात दुष्काळ आहे. पण शेतकऱ्यांनी चिंता करू नये. आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीर आहे. आज बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे असते तर सण उत्सव बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांच्या मदतीला धावा, असे ते म्हणाले असते. तेच आम्ही करतो आहेत.

शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न असेल तर…

शेतकऱ्यांना आम्ही दिवाळीचा शिधा देण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या एकही दिवस मला शिवा दिल्याशिवाय जात नाही. ते आमच्यावर टीका करतात. आम्ही कामातून उत्तर देत आहोत. आम्ही फक्त भाषण देणार नाहीत. आम्ही शेतकऱ्यांना राशन देणारे आहोत. आम्ही परभणीत 25 हजार शिलाई मशिनींचे वाटप केले. आम्ही शेतकऱ्यांच्या मुलींना 25000 सायकलींचे वाटप करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. ज्या शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न असेल त्या लेकीचे लग्न करण्याची जबाबदारी शिवेसनेने घेतली आहे. सामूहिक विवाहसोळे आयोजित केले जातील. शिवसेना कुठेही मागे राहणार नाही.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

आपल्या भाषणात शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो. तुम्ही साधा बिस्कीटचा पुडा तरी घेऊन जा, असा टोला शिंदे यांनी लगावला. शेतकऱ्यांना, सामान्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!