AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Thackeray : अमित ठाकरेंच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्याआधी मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं?

अमित ठाकरे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर येणार आहे. पण शहरातील बॅनरवरून जिल्हाधक्षांचा फोटोच गायब झाल्याने मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे .

Amit Thackeray : अमित ठाकरेंच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्याआधी मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं?
amit thackeray news Image Credit source: Social media
| Updated on: Aug 20, 2026 | 9:10 AM
Share

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे कल्याण-डोंबिवलीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने झेंडे-बॅनरबाजीच्या माध्यमातून मोठं शक्तीप्रदर्शन केलं आहे. या बॅनरवर पक्षातील सर्व नेतेमंडळीचे फोटो पाहायला मिळत आहेत. परंतु पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब असल्याचे समोर आलं आहे. या फोटो पॉलिटिक्समुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर येणार आहेत. अमित ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच सदस्य नोंदणी आणि कॉलेज युनिटचे उद्घाटन अमित ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. या दौऱ्याआधी शहरभर मनसेचे झेंडे आणि मोठमोठे बॅनर लावून जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. मनसे माजी आमदार कल्याण शहराध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या स्वागत बॅनरवर अमित ठाकरेंसह इतर पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत. मात्र जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर याचा फोटो गायब आहेत . जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब असल्याने मनसेच्या गोटात ‘फोटो पॉलिटिक्स’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जाणीवपूर्वक फोटो टाळला की अनवधानाने राहिला, याबाबत मनसेकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण नाही. मात्र अमित ठाकरेंच्या दौऱ्याआधी शक्तिप्रदर्शनासोबतच मनसेतील अंतर्गत राजकारणही चर्चेत आलं आहे. अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेची ताकद दाखवण्याची तयारी दिसून येत आहे. मात्र बॅनरबाजीमुळे अंतर्गत समीकरणे पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

ब्रिजभूषण सिंगच्या समर्थनावरून भाजप-मनसेत वाद

काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीत ब्रिजभूषण सिंग यांच्या समर्थनावरून भाजप मनसे वाद पेटला. ब्रिजभूषण सिंगला सलाम, राज ठाकरे एकदाही उत्तर प्रदेशला गेले नाहीत. हे उत्तर भारतीय आहेत, गरिबांना तर कोणीही मारू शकतात, असं म्हणत भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा ब्रिजभूषण सिंग यांचं कौतुक करत राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला. तर डोंबिवलीत सर्व एकत्र आहेत. वातावरण खराब करू नका. तुमची राज ठाकरेंवर बोलण्याची औकात नाही. अनधिकृत बांधकामांसाठी उत्तर भारतीयांची हुजरेगिरी करतात. टोळी घेऊन फिरणाऱ्यांनी साहेबांचे नाव घेऊ नये, अशा शब्दात मनसे शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी भाजपच्या नंदू परब यांना सुनावले.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात