स्वयंपाक करताना किचन थंड ठेवायचंय? तर ‘या’ सर्वोत्तम कूलिंग सोल्यूशन्सचा करा वापर

स्वयंपाकघरात जेवण बनवताना खुप गरम होते,परंतू तुम्ही या काही सर्वोत्तम कूलिंग सोल्यूशन्सचा वापर केल्यास स्वयंपाक घरातील वातावरण देखील थंड राहील.

स्वयंपाक करताना किचन थंड ठेवायचंय? तर या सर्वोत्तम कूलिंग सोल्यूशन्सचा करा वापर
विजय वर्माच्या नवीन घरातील हे स्वयंपाकघर आहे. हे मॉड्यूलर किचन आहे. किचनला बाल्कनी देखील जोडलेली. इथेच फराह आणि दिलीप यांनी त्यांच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवला होता
Image Credit source: instagram
Updated on: Jun 04, 2025 | 12:30 AM

स्वयंपाकघरात काम करणे खूप कठीण होते आणि ते कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नसते. गॅस, वाफ, घाम तसेच विदयूत उपकरणांची उष्णता या सर्वांमुळे स्वयंपाक करणे आणखी कठीण होते. अशावेळी प्रत्येकाला स्वयंपाकघर थंड आणि आरामदायी राहावे असे वाटते, जेणेकरून स्वयंपाक करताना घामाचा त्रास सतावणार नाही. जर तुम्हालाही तुमच्या स्वयंपाकघरात थंडावा मिळावा उष्णता कमी करण्यासाठी आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही सोपे आणि स्वस्त उपाय सांगणार आहोत जे स्वयंपाकघर थंड ठेवण्यास मदत करू शकतात. चला जाणून घेऊयात…

स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन बसवा

प्रत्येक स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक आहे. कारण हे स्वयंपाक घरातील उष्णता बाहेर काढून टाकते. त्यामुळे स्वयंपाकघर थंड राहते. त्याचे अनेक फायदे आहेत जसे की ते गरम हवा काढून टाकते आणि स्वयंपाकघरात हवेचे अभिसरण सुधारते. ते खूपच स्वस्त आहे आणि कमी वीज वापरते.

टॉवर कूलर वापरा

टॉवर कूलर हा एक पातळ आणि लांब कूलर आहे जो कमी जागेत सहज बसतो. तुम्ही तो स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात ठेवू शकता. टॉवर कूलर स्वयंपाकघरात ठेवल्याने किचनमधील वातावरण थंड राहते. यामुळे उष्णता कमी होते.

मिनी कूलर किंवा टेबल कूलर

जर तुमच्याकडे स्वयंपाक घरात खूप कमी जागा असेल, तर मिनी कूलर किंवा टेबल कूलर हा एक चांगला पर्याय आहे. कारण हे कुलर लहान असले तरी थेट थंड हवा देते. तसेच हे कुलर खूप हलके आणि पोर्टेबल आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवा तिथे घेऊन जाऊ शकता. तो परवडणाऱ्या किमतीत थंडपणा देतो. लहान जागांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

ड्युअल फंक्शन फॅन

ड्युअल फंक्शन फॅन म्हणजे असा फॅन जो केवळ हवाच देत नाही तर हवा फिल्टर देखील करतो आणि या फॅनमधील काही मॉडेल्स थंड हवा देखील देतात. त्याचे फक्त एकच नाही तर अनेक फायदे आहेत. थंड आणि स्वच्छ हवा, हा फॅन वजनाने एकदम हलका असल्याने सहज हलवता येते. वीज देखील वाचते. लक्षात ठेवा की स्वयंपाकघरात व्हेटिंलेशन खूप महत्वाचे आहे.