अंबानी कुटुंबियांचे या पदार्थाशिवाय होत नाही जेवण पूर्ण, दररोज एक वाटी..
अंबानी कुटुंबियांबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. अत्यंत लग्झरी लाईफ अंबानी कुटुंब जगत असले तरीही जमिनीशी त्यांचे नाते कायम आहे. अंबानी कुटुंबियांचा आहार अत्यंत साधा आहे. याबाबतच आता मोठी माहिती पुढे येतंय.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. नेहमीच अंबानी फॅमिली चर्चेत असते. अंबानी फॅमिलीच्या खासगी आयुष्याबद्दल लोकांना नेहमीच जाणून घ्यायचे असते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे घर अंबानी कुटुंबाकडे आहे. 27 मजली मुंबईतील त्यांचे अँटिलिया आहे. हेलिपॅड्स आणि 600 कर्मचाऱ्यांचा ताफा असलेल्या आलिशान जीवनशैलीचा त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. आज अंबानी कुटुंब जगातील कोणत्याही हॉटेलचे जेवण मागू शकतात. मात्र, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सवयी अत्यंत आर्श्चयकारक आहेत. अजिबात त्यांचा बडेजाव पणा बघायला मिळत नाही. अत्यंत साधे आणि घरगुती जेवणावर त्यांचा भर असतो. विशेष म्हणजे अंबानी कुटुंबासाठी जे जेवण बनते, तेच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीही.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. आठवड्याचा मेन्यू ठरलेला असतो. 600 कर्मचाऱ्यांसाठी दररोज जेवण बनते. अंबानींच्या जेवणात 32 प्रकारच्या भाज्या असतात. सलाड देखील असते. मात्र, भाज्या बदलतात, दररोज वेगवेगळ्या भाज्या त्यांच्या जेवणात असतात. मात्र, यादरम्यान अशी एक गोष्ट आहे, जी अंबानींच्या जेवणात असते म्हणजे असते.
त्याशिवाय अंबानी कुटुंबियांचे जेवणच पूर्ण होत नाही. बाकी काही असो किंवा नसो पण हा एक असा पदार्थ आहे, जो अंबानी कुटुंबियांना जेवणात पाहिजेच असतो. गुजराती डाळ अंबानी कुटुंबियांच्या जेवणात असते म्हणजे असते, त्याशिवाय त्यांचे जेवण पूर्णच होऊ शकत नाही. ही डाळ गोड, तिखट आणि थोडीशी अंबट असते. खास पद्धतीने ही डाळ तयार केली जाते.
वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांना आपल्या जेवणात ही डाळ लागते, त्याशिवाय त्यांचे जेवण पूर्णच होत नाही. अत्यंत साधी आणि सोपी ही डाळ आहे. अंबानी कुटुंबातील जवळपास लोकांना ही डाळ आवडते, त्यांच्या जेवणात ही डाळ असते म्हणजे असते. रान भाज्या देखील अंबानी कुटुंबियांच्या जेवणात असतात. अंबानी कुटुंबियांकडून रात्रीचे जेवण हलके आणि पचणास सोपे घेतले जाते. नाचणीची भाकरी आणि डाळीसोबत काही भाज्या जेवणात असतात.