MISS WORLD : जगातल्या पहिल्या मिस वर्ल्डच्या त्या सूटची अजूनही होतेय चर्चा, या देशांनी घातली बंदी, दिले हे मोठे कारण…

मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेनंतर बिकीनीवर अनेक देशांनी बंदी घातली होती. मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या स्पर्धकांनाही देशात येण्यास बंदी घातली होती. बिकिनी घालण्याची सुरुवात कुठून झाली हे तुम्हाला माहिती आहे का? याच बिकिनीचाही एक मनोरंजक इतिहास आहे.

MISS WORLD : जगातल्या पहिल्या मिस वर्ल्डच्या त्या सूटची अजूनही होतेय चर्चा, या देशांनी घातली बंदी, दिले हे मोठे कारण...
MISS WORLDImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 12:45 AM

नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : आजच्या काळात बिकिनी घालणे ही महिलांची एक प्रकारची फॅशन झाली आहे. अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्स दररोज बिकिनी घालून फोटोशूट करतात. देश-विदेशातील अनेक समुद्र किनाऱ्यावर महिला आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत बिकिनी घालून मजा करतात. बिकिनी हे बहुतेक महिलांचे आवडते बीचवेअर आहे यात शंका नाही, पण, बिकिनी घालण्याची सुरुवात कुठून झाली हे तुम्हाला माहिती आहे का? याच बिकिनीचाही एक मनोरंजक इतिहास आहे.

1951 मध्ये ब्रिटनमध्ये बिकिनी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यालाच मिस वर्ल्ड असे नाव देण्यात आले. या सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी बिकिनी परिधान केली होती. स्वीडनची 22 वर्षीय कर्स्टिन मार्गारेथा हॅकनसन ‘किकी’ ही पहिली मिस वर्ल्ड बनली. किकी हिने बिकिनी घालून मिस वर्ल्डचा मुकुट परिधान केला होता. 1951 मध्ये ब्रिटनमध्ये बिकिनी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. याच स्पर्धेला ‘मिस वर्ल्ड’ असे नाव देण्यात आले. बिकिनीमध्ये मुकुट परिधान केलेली पहिली मिस वर्ल्ड लोकांना आवडली नाही. त्याला जोरदार विरोध झाला होता.

फॅशन डिझायनरने नव्हे तर अभियंत्याने केली डिझाइन

पहिली ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा जरी 1951 मध्ये झाली असली तरी 5 जुलै 1946 रोजी फ्रेंच अभियंता ‘लुई रीअर्ड’ याने आधुनिक बिकिनी म्हणजेच 2 पीस स्विमसूट सादर केला होता. पॅसिफिक महासागराच्या जवळ असलेल्या ‘बिकिनी ॲटोल’ नावाच्या ठिकाणी बॉम्बची चाचणी करण्यात आली होती. लुई रीअर्ड याचा हा अविष्कारही त्यावेळी बॉम्बपेक्षा कमी मानला जात नव्हता. त्यामुळे लुई रीअर्ड याने त्या स्विमसूटला बिकिनी असे नाव दिले.

50 हजार चाहत्यांची जाहीर नाराजी

लुई रीअर्ड याने बिकिनी तयार केली. त्याचे उप्तादन सुरु केले. पण, बराच काळ गेला तरी कोणतीही अभिनेत्री किंवा मॉडेल बिकिनी घालायला तयार नव्हती. कोणतीही महिला जाहिरात करण्यास तयार नव्हती. परंतु, 19 वर्षीय डान्सर मिशेलिनने बिकिनी जाहिरात करण्यास होकार दिला. जाहिरात आल्यानंतर मिशेलिन हिला सुमारे 50 हजार चाहत्यांनी पत्रे पाठवून जाहीर नाराजी व्यक्त केली.

या देशांनी घातली होती बंदी

ब्रिटन येथे झालेल्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेनंतर बिकीनीवर अनेक देशांनी बंदी घातली होती. मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या स्पर्धकांनाही देशात येण्यास बंदी घातली होती. स्पेन, इटली, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, जपान यासारख्या त्या काळच्या बलाढ्य देशांनी बिकिनी वर बंदी घातली होती. पण, हळूहळू या देशांनी बिकिनी स्वीकारली. बंदी उठल्यानंतर अवघ्या 4 वर्षांत बिकिनीने जगभरातील बाजारपेठांमध्ये आपला ठसा उमटवला. दर वर्षी 5 जुलै हा आंतरराष्ट्रीय बिकिनी दिवस म्हणून साजरा केला जातो.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.