Survey: पैशांच्या बाबतीत 20.8% पतींचा पत्नीवर अजिबात नाही विश्वास, वाचा रंजक आकडेवारी !

| Updated on: Sep 19, 2022 | 10:45 AM

भारतीय पतींचा त्यांच्या पत्नीबाबत काय दृष्टिकोन असतो, ते त्यांच्याबद्दल काय विचार करतात, ही माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली आहे.

Survey: पैशांच्या बाबतीत 20.8% पतींचा पत्नीवर अजिबात नाही विश्वास, वाचा रंजक आकडेवारी !
Follow us on

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (National family health survey) भारतीय पतींचा आपल्या पत्नींबद्दलचा दृष्टिकोन समोर आला आहे. पती (Husband) पत्नीबद्दल (wife) काय विचार करतात, त्यांच्यावर किती नियंत्रण ठेवतात, पैशांबाबात त्यांचे काय मत आहे, हे सर्व सर्वेक्षणातून दिसून आले आहे. हे सर्वेक्षण 60 हजारांपेक्षा अधिक (more than 60 thousand people) व्यक्तींवर करण्यात आले असून त्यामधून अनेक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. पतीचे पत्नीशी कसे वागणे आहे, ते त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात की मनमोकळेपणाने वागतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे या सर्वेक्षणात (survey) सहभागी व्यक्तींनी दिली आहे. जाणून घ्या काय म्हणते आकडेवारी..

– हे सर्वेक्षण 18 ते 49 या वयोगटातील 62 हजारांहून अधिक महिलांवर करण्यात आले. ज्यातून बरीच महत्वाची माहिती मिळाली आहे. या सर्वेक्षणानुसार, 19.9% पती हे त्यांच्या पत्नीला त्यांच्या मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी परवानगी देत नाहीत.

– पत्नीने इतर कोणत्याही पुरुषाशी बोलल्यास किंवा संवाद साधल्यास 26.3% पती, त्यांच्या पत्नीवर चिडतात. आपल्या पत्नीने इतरांशी बोललेले त्यांना बिलकुल आवडत नाही.

– या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, 20.8% पतींचा, पैशांच्या बाबतीत त्यांच्या पत्नीवर अजिबात विश्वास नसतो.

-या सर्वेक्षणात 62 हजारांहून अधिक महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानुसार, 19.4% पती हे त्यांच्या बायकांचे लोकेशन काय आहे, त्या कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी सतत चिंतेत असते, त्यांच्यावर लक्ष ठेवतात.

– तर 15.5% पतींना असे वाटते की त्यांच्या पत्नीने कुटुंबियांशी अतिशय कमी बोलावे किंवा कमी संबंध ठेवावा. सर्वेक्षणात ही गोष्ट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे.

– तर 10.7% टक्के पतींचा त्यांच्या पत्नीवर अजिबात विश्वास नसतो, ते त्यांच्यावर व्यभिचार केल्याचा आरोप लावतात.