Snakes Hide At These Places : घरातले हे 4 कोपरे म्हणजे सापांचा फेव्हरिट अड्डा, ऐटीत बसतात.. पण टरकतात फक्त या लिक्विडला; कसं? घ्या जाणून
Snakes Hide At These Corners Of Home : जर तुम्हाला पावसाळ्यात सापांपासून वाचायचं असेल तर घरातील या कोपऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवा. काही जागा म्हणजे सापांची लपण्याची आवडती ठिकाणे आहेत. तसेच साप तुमच्या घराजवळ येऊ नयेत म्हणून काही खबरदारी घ्यावी, कशी, ते जाणून घेऊया.

Snakes Hide At These Places : सध्या पावसाळा जोमाने सुरू झाला असून बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. मात्र पावसाळ्यात अनेक लोकांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे, एक नव्हे तर दोन किंवा तीन साप त्यांच्या घरात घुसतात आणि अशा ठिकाणी लपतात, के ते सहज दिसतही नाहीत. त्यामुळे जीवालाही धोका पोहोचू शकतो. अशा वेळी घरातील कोणत्या ठिकाणी साप लपू शकतात, कोणत्या जागा त्यांच्या आवडत्या असतात हे एक्स्पर्टनी सांगितलं आहे. तसेच घरातील कोणत्या जागा, कोणते कोपरे स्वच्छ ठेवावेत, कुठे बारीक लक्ष ठेवावं हेही समजून घेऊया.
या ठिकाणी आवर्जून करा सफाई
एक्स्पर्टच्या सांगण्यानुसार, सापांना आराम करण्यासाठी उबदार आणि आरामदायी जागा हवी असते. याशिवाय, अंधारी जागा तसेच ओली जागा सापांना हवी असते जेणेकरून त्यांना पाण्याची समस्या भासू नये. अशा परिस्थितीत, जर तुमच्या घरात किंवा तुमच्या घराजवळ अशी एखादी बाग असेल जिथे पाणी चांगले वाहत असेल आणि उंच गवत वाढले असेल, तर ती स्वच्छ करा आणि काळजी घ्या.
या ठिकाणी विशेष काळजी घ्या
त्याशिवाय, बेडखाली आणि कोपऱ्यात जिथे पूर्णपणे अंधार असतो, अशा ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. कारण साप नेहमीच अंधारी जागा पसंत करतात जेणेकरून ते कोणाच्या सहज नजरेत येणार नाहीत. बऱ्याच घरात स्टोअर रूम असते किंवा एखाद्या खोलीत अनेक जुन्या वस्तू एकत्र ठेवल्या जातात, तिथेही लक्ष दिले पाहिजे. आम्ही अनेक घरांमध्ये साप पकडले आहेत, जिथे साप बादलीत लपला होते असे एक्स्पर्टनी सांगितलं. .
झाडं आणि वनस्पतींमध्येही लपतात साप
खरंतर, ती बादली उलटी ठेवली होती आणि ती अंधारातही होती. त्यामुळे तेथे साप रात्रभर बादलीत आरामात झोपला. अशा परिस्थितीत, अशा झाकलेल्या गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे.असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात मोठ्या बागा आहेत, खूप झाडंझुडुपं आहेत, त्यांच्या घरात जास्त साप दिसतात. अशा परिस्थितीत, बागेतील गवत व्यवस्थित कापून ठेवावे.
घराच्या आसपास शिंपडा फिनाईल आणि ॲसिडचं मिश्रण याशिवाय, तुम्ही फिनाईल आणि ॲसिड एकत्र करून ते मिश्रण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती आणि घराभोवती शिंपडू शकता. ते खूप प्रभावी ठरते. त्यामुळे अशा परिस्थितीत, साप त्या ठिकाणी जाणार नाही. मात्र, जर तुम्हाला ॲसिड टाकायचे नसेल, तर तुम्ही घराच्या कोपऱ्यात फिनाईल टाकलं तरी सापाला त्याचा वास अजिबात आवडत नाही आणि तो अशा ठिकाणी जात नाही. हे उपाय प्रभावी ठरू शकतात.
