क्रूर औरंगजेब होता दासीच्या प्रेमात; तिचं सौंदर्य पाहून थेट बेशुद्धच पडला; दासीला मिळवण्यासाठी त्याने काय काय नाही केलं
औरंगजेबला भारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुघल सम्राट म्हटलं जात. पण तो पहिल्याच नजरेत एका दासीच्या प्रेम पडला होता. तिचं सौंदर्य पाहून तो चक्क 3 ते 4 तास बेशुद्ध पडला होता. ही कहाणी फार कमी जणांनी माहित आहे. या दासीचं नाव होतं हिराबाई. औरंगजेब आणि हिराबाई यांची प्रेमकहाणी नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे.

औरंगजेब म्हणजे कट्टर आणि धर्मांध बादशाहा होता तसच त्याला भारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुघल सम्राट म्हटलं जात. पण तो पहिल्याच नजरेत एका दासीच्या प्रेम पडला होता. तिला पहिल्यांदा पाहातच तिचं सौंदर्य पाहून तो बेशुद्ध पडला. ही कहाणी फार कमी जणांनी माहित आहे. या दासीचं नाव होतं हिराबाई. औरंगजेब आणि हिराबाई यांची प्रेमकहाणी नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे.
प्रेमकहाणी काय?
औरंगजेबला दुसऱ्यांदा दख्खनचा गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. औरंगाबादला जाताना वाटेत बुऱ्हाणपूर हे शहर लागतं. हे शहर मध्यप्रदेश राज्याच्या ताप्ती नदीच्या उजव्या तीरावर वसलंय. याच ठिकाणी औरंगजेबाची आई मुमताजचा मृत्यू झाला होता. तिचं ताजमहालमध्ये दफन करण्यापूर्वी बुऱ्हाणपूर मध्ये दफनविधी करण्यात आला होता.
या शहरात औरंगजेबाची मावशी सुहेला बानो राहत होती. तिचा विवाह मीर खलील खान-ए-जमान याच्याशी झाला होता. आपल्या मावशीला भेटायचं म्हणून औरंगजेब बुऱ्हाणपूरमध्ये उतरला. त्याचे मामा मीर खलील खान-ए-जमान होते. औरंगजेब बुरहानपूरातील जैनाबादच्या ‘आहू खाना’ बागेत फिरत असताना त्याचवेळी औरंगजेबाची मावशी तिच्या दासींसोबत बागेत फिरायला आली होती. त्यातच एक दासी होती, जी कमालीची सुंदर मोहक आवाजाची गायिकाही होती. या सर्व दासी एकामागून एक तिथंच असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली जमा झाल्या होत्या. मात्र तिथेच असलेल्या औरंगजेबकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही.
पाहताच क्षणी प्रेमात पडला
तो तिथे उभे राहून फक्त त्या दासीकडे पाहत होता. कोणत्यातरी कारणावरून त्याच्या मावला त्या दासीचा राग आल्याने ती तिला झापत होती. तेव्हा औरंगजेबाकडे एक कटाक्ष टाकताच ती दासी पुढं गेली. तेव्हा तिच्या या नजरेनं औरंगजेब तिथेच घायाळ झाला. आणि औरंगजेब तिच्या प्रेमात पडला . मौलाना अबुल कलाम आझाद यांनी ‘गुबर-ए-खातीर’ ही रचना केली आहे. यामध्ये नवाब शम्स-उद-दौला शाहनवाज खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल हयी खान यांच्या ‘मसर-अल-उमारा’ या पुस्तकाचा उल्लेख आहे. या पुस्तकात याबाबत लिहिलेलं असल्याचं म्हटलं जातं.
औरंगजेबाचा स्वतःवरचा ताबा सुटला
हमीदुद्दीन खान यांनी त्या पुस्तकात औरंगजेबाचे चरित्र लिहिलं आहे. हमीदुद्दीन खान यांनी या घटनेचं वर्णन थोड्या वेगळ्या पद्धतीने केलं आहे. ते म्हणतात की, “ते घर औरंगजेबाच्या मावशीचंच असल्याने दासी पडद्यात नव्हत्या. आणि तशी फारशी काळजीही घेतली नव्हती. त्यामुळे औरंगजेबही काही न कळवता घरी आला. तेव्हा त्याने हिराबाईला पाहिलं.” तिला पाहताच औरंगजेबाचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्याला तिथेच भोवळ आली. ही बातमी त्याच्या मावशीपर्यंत पोहोचली. ती अनवाणी पायाने धावत औरंगजेबाजवळ पोहोचली. तीन चार तासानंतर औरंगजेबाला शुद्ध आली.
तो शुद्धीवर आल्यावर मावशीने त्याला विचारलं,की, “हा कसला आजार आहे?’ तुझ्यासोबत यापूर्वी असं काही झालंय का?” तिच्या या प्रश्नावर औरंगजेब शांतच होता. त्यानं उत्तर दिलं नाही. तो म्हणाला, “मी जर तुला आजार सांगितला तर तू तो बरा करशील का?”, यावर त्याची मावशी आनंदाने म्हणाली, “तू उपचारांचं बोलतोयस पण मी तुझ्यासाठी माझे प्राणही त्यागीन.”
हिराबाईंना मिळवण्यासाठी त्याने सगळे प्रयत्न केले
यानंतर औरंगजेबाने घडला प्रकार मावशीला सांगितला. हे ऐकून ती गप्प झली. शेवटी औरंगजेब म्हणाला, “तू माझ्या प्रश्नांचीच उत्तर देत नसशील तर माझ्यावर उपचार कसे करणार”. यावर त्याची मावशी म्हणाली, “मी तुझ्यासाठी स्वतःचा त्याग करीन! पण तुला माझा नवरा माहीतच आहे. तो एक भयंकर माणूस आहे. तो आधी हिराबाईला ठार करील आणि नंतर माझा जीव घेईल. त्याला सांगूनही काही फायदा होणार नाही. त्या बिचाऱ्या हिराबाईचा यात हकनाक बळी जाईल.”
यावर औरंगजेबाने याबाबत प्रयत्न करणार असल्याचं त्याच्या मावशीला सांगितलं.पुढे त्याने हिराबाईला मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. काही इतिहासकारांच्या मते हिराबाईंचे खरे नाव बदलण्याबद्दलही एक कथा आहे. इतिहासकार यदुनाथ सरकार यांच्या मते, अकबराच्या काळात एक नियम बनवण्यात आला होता. यानुसार, हरममधील महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या खऱ्या नावाने हाक मारली जात नव्हती. त्यांची नावे त्यांच्या शहराच्या किंवा जन्मस्थळाच्या नावावरून ठेवण्यात आली. म्हणूनच जेव्हा हिराबाई औरंगजेबाच्या हरममध्ये पोहोचल्या, तेव्हा त्या जैनाबादच्या असल्याने त्याचे नाव जैनाबादी महाल पडले.
हिराबाईंचे नाव आणि त्या खरंच औरंगजेबसोबत आल्या होत्या का? याबाबत अनेक संदर्भ आहेत
तसेच काही जण म्हणतात की त्याने चित्राबाईच्या बदल्यात हिराबाई मिळवल्याही होत्या. मात्र इतिहासकार रामानंद चॅटर्जी यांनी लिहिले आहे की औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह याने त्याचे वडील शाहजहान यांना या घटनेबद्दल सांगितले होते. असे म्हटले जाते की दारा शिकोहने औपचारिक तक्रार केली होती की औरंगजेब त्याच्या मावशीच्या घरातील एका मोलकरणीमुळे उद्ध्वस्त होत आहे. असे म्हटले जाते की नोव्हेंबर 1653 मध्ये हिराबाई देखील औरंगजेबासोबत दौलताबादला गेल्या होत्या. तथापि, त्यांचे निधन 1654 मध्ये झाले. त्यामुळे याचे नेमके संदर्भ पुस्तकांमधूनच समोर येतात. पण त्याची आणि हिराबाईंची प्रेम कहाणी मात्र सत्य असल्याचं बोललं जातं.
