
शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवण्यासाठी आपण अनेक ठिकाणी फिरायला जात असतो. पावसाळ्यात निसर्गातील सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक म्हणजे धबधबे. जे उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने अद्भूत दिसतात. जगातील अनेक धबधबे हे त्यांच्या सौंदर्यासाठी पाण्याच्या प्रवाहासाठी आणि उंचीसाठी प्रसिद्ध आहेत. अशातच आपल्या भारतात असे काही धबधबे आहेत ज्यांना त्यांच्या उंचीमुळे एक खास ओळख निर्माण झाली आहे. हे धबधबे निसर्गाच्या सानिध्यात त्यांच्या सौंदर्याचा जिवंत पुरावा देखील देतात. त्यामुळे हे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. चला तर मग आजच्या लेखात आपण अशाच 6 उंच धबधब्यांबद्दल जाणून घेऊयात…
1. कुंचिकल धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. तो सुमारे 455 मीटर म्हणजेच 1,493फूट उंच आहे. हा धबधबा कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील मस्तिकट्टे जवळील निदागोंडू गावात वराही नदीवर आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य मनाला भुरळ घालते. जर तुम्ही कर्नाटकला गेलात तर तुम्ही या सुंदर ठिकाणाला भेट देऊ शकता.
2. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा बेरेहिपानी धबधबा आहे. हा धबधबा ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात बुधाबलंगा नदीवर आहे. त्याची उंची 399 मीटर म्हणजेच 1,309 फूट उंच आहे. जर तुम्ही कधी जगन्नाथ मंदिराला भेट देणार असाल तर तुम्ही येथेही भेट देण्याची प्लॅन करू शकता. हे पुरीपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे.
3. नोहकालिकाई धबधबा तिसऱ्या क्रमांकावर येतो. जो 40 मीटर म्हणजेच 1,115 फूट उंचीचा हा धबधबा मेघालय राज्यात चेरापुंजी (ज्याला सोहरा असेही म्हणतात) जवळ आहे. हा धबधबा सर्व बाजूंनी पर्वत आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. येथे तुम्हाला ट्रेकिंग करण्याची संधी मिळू शकते. तसेच, जवळपास भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
4. नोहशांगथियांग धबधबा मावसमाई धबधबा म्हणूनही ओळखला जातो. हा मेघालयात आहे. त्याची उंची 315 मीटर म्हणजेच 1,033 फूट उंच आहे. हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. हा सेव्हन सिस्टर वॉटरफॉल म्हणूनही प्रसिद्ध आहे. हा शिलाँगपासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे.
5. दूधसागर धबधब्याबद्दल सर्वांना माहिती आहे. हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे, ज्याची उंची 310 मीटर म्हणजेच 1017 फूट उंच धबधबा आहे. गोव्यात स्थित हा एक अतिशय लोकप्रिय धबधबा आहे. धबधब्यापर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत. गोव्याच्या सहलीचे नियोजन करणारे बहुतेक लोक येथे नक्कीच भेट देतात.
6. किनरेम धबधब्यातून 305 मीटर म्हणजेच 1,001फूट उंचीवरून पाणी पडते. हा धबधबा मेघालय राज्यातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील चेरापुंजीपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. तो तीन स्थंरावरून पडतो. हा धबधबा सर्व बाजूंनी हिरवळीने वेढलेला आहे. हे ठिकाण फोटोग्राफीसाठी खूप प्रसिद्ध आहे.