‘नरकाचा दरवाजा’! तुर्कमेनिस्तानकडून बंद करण्याची तयारी सुरु, कशी झाली याची सुरुवात?

तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती गुलबांगुली बर्डीमुखामेदोव यांनी हा दरवाजा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही आग विझवण्यासाठी उपाय शोधा, असे आदेश राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, हा काही पहिलाच आदेश नाही. 2010 मध्येही राष्ट्रपतींना ही आग विझवण्याचे आदेश दिले होते.

'नरकाचा दरवाजा'! तुर्कमेनिस्तानकडून बंद करण्याची तयारी सुरु, कशी झाली याची सुरुवात?
gateway-of-hell (Photo - BBC)
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 10:46 PM

नवी दिल्ली : तुर्कमेनिस्तानमध्ये बनललेला ‘नरकाचा दरवाजा’ (Gateway to hell) बंद करण्याची तयारी सध्या सुरु आहे. तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती गुलबांगुली बर्डीमुखामेदोव (Gurbanguly Berdymukhamedov) यांनी हा दरवाजा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही आग विझवण्यासाठी उपाय शोधा, असे आदेश राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, हा काही पहिलाच आदेश नाही. 2010 मध्येही राष्ट्रपतींना ही आग विझवण्याचे आदेश दिले होते. मात्र, तेव्हा ते शक्य झालं नव्हतं.

तुर्कमेनिस्तानमध्ये काराकुम नावाचे वाळवंट आहे. या ठिकाणाच्या उत्तरेकडे ग्रेटर नावाचा एक मोठा खड्डा आहे. या खड्डा तब्बल 69 मीटर रुंद आणि 30 मीटर खोल आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा खड्डा आग ओकत आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये या खड्ड्याला नरकाचा दरवाजा म्हटलं जातं. या खड्ड्यातून निघणाऱ्या आगीमुळे परिसरात मिथेन गॅसचा फैलाव होत आहे.

बीबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार या खड्ड्याची माहिती 1971 मध्ये मिळाली, जेव्हा सोव्हियत संघाचे वैज्ञानिक वाळवंटात कच्च्या तेलाचे साठे शोधत होते. ही शोधमोहीम सुरु असताना या मिथेन गॅसच्या साठ्याचा शोध लागला. मात्र जमिन खचली आणि इथे मोठा खड्डा तयार झाला. या खड्ड्यातून निघणारा मिथेन गॅस वातावरणात पसरण्याची भीती आहे. या धोका रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी त्यात आग लावली. जेव्हा मिथेन गॅस संपेल तेव्हा ही आग आपोआप विझेल असा दावा केला होता, मात्र तसं होऊ शकलं नाही.

अनेक आश्चर्यकारक बाबी समोर

2013 मध्ये नॅशनल जिओग्राफिक चॅनल या खड्ड्याबाबत एक प्रोग्राम तयार करण्यासाठी तिथे पोहोचलं होतं. कव्हरेजसाठी तिथे गेलेल्या दलाचे सदस्य असलेले जॉर्ज कोरोनिस यांनी त्या खड्ड्यांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर तुर्कमेनिस्तानचे भू-वैज्ञानिक यांचं म्हणणं होतं की हा खड्डा 1960 च्या दशकात बनला होता. मात्र, त्यात आग 1980 च्या दशकात लागली.

पर्यटन स्थळ म्हणून प्रचलित

हळू-हळू जगभरात या खड्ड्याबाबत चर्चा सुरु झाली आणि हा खड्डा तुर्कमेनिस्तानमध्ये सर्वात चर्चित आणि आकर्षित करणारं पर्यटन स्थळ म्हणून पुढे आलं. दरवर्षी हा खड्डा पाहण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक पोहोचतात आणि त्याचा फोटो घेण्यास विसरत नाहीत. आपल्या लोकेशनपासून काही किलोमीटर अंतरावरुनच हा खड्डा पाहायला मिळतो.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार सुरुवातीला लोकांच्या मनात या खड्ड्याबाबत नकारात्मक विचार राहिले होते. मात्र, हळू-हळू हा खड्डा पाहणे आणि समजून घेण्यात या खड्ड्याची लोकप्रियता वाढत गेली आहे. वेळेनुसार या खड्ड्याच्या लोकप्रियतेमुळे 2018 मध्ये या खड्ड्याला अधिकृतरित्या नाव मिळालं. राष्ट्रपती यांनी या खडड्याला शायनिंग ऑफ काराकुम असं नाव दिलं. आज जेव्हा कधी तुर्कमेनिस्तानचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा हा खड्डा नक्कीच विचारात येतो.

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 44 हजारापेक्षा अधिक रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांचा आकडाही दोनशे पार

Goa Assembly Election 2022 : काँग्रेस, आपच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुणाला कुठून संधी?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.