मुंबई : मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत हलकी घट झाली असली तर राज्यातील रुग्णसंख्या मात्र 45 हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागानं (Health Department) दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. तर 15 हजदार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनची लागण झालेले दोनशेहून अधिक रुग्ण आज आढळून आले आहेत.