भारतातील अनोखे मंदिर; जिथे होते चक्क बुलेटची पूजा, जाणून घ्या यामागची कारणे

| Updated on: May 29, 2021 | 10:40 PM

दुचाकीचे हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून बरेच लोक हे अनोखे दुचाकी मंदिर बघायला याठिकाणी भेट देतात. (Unique temples in India; Where there was a lot of bullet worship, know the reasons behind it)

भारतातील अनोखे मंदिर; जिथे होते चक्क बुलेटची पूजा, जाणून घ्या यामागची कारणे
भारतातील अनोखे मंदिर
Follow us on

नवी दिल्ली : भारतात लोकांची कशावर ना कशावर श्रद्धा असते. कुणी दगडामध्ये देव पाहते, तर कुणी व्यक्ती एखादे झाड किंवा प्राण्यासमोर आपले डोके टेकते. पण, राजस्थानमध्ये असे एक स्थान आहे, जेथे लोक मूर्तींची नव्हे तर मोटारसायकलींची पूजा करतात. तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटले असेल, पण ही बाब खरी आहे. येथे केवळ दुचाकीची पूजा केली जाते. इथल्या लोकांचा हा विश्वास आहे की ते दुचाकींची पूजा केल्यामुळेच स्वत:चे संरक्षण करतात. या पूजेतून त्यांची इच्छादेखील पूर्ण होते. दुचाकीचे हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून बरेच लोक हे अनोखे दुचाकी मंदिर बघायला याठिकाणी भेट देतात. (Unique temples in India; Where there was a lot of bullet worship, know the reasons behind it)

या दुचाकीमध्ये असे विशेष काय आहे आणि त्यामागची कथा काय आहे, ज्यामुळे लोक बरीच वर्ष जुन्या दुचाकींमध्ये देवाचा शोध घेत आहेत. हे मंदिर केवळ राजस्थानच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात प्रसिद्ध आहे. भाविक येथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात, पूजा करतात, आरती करतात आणि आपल्या मनोकामना व्यक्त करतात.

कोठे आहे हे मंदिर?

हे मंदिर राजस्थानमधील जोधपूर-पाली महामागार्पासून 20 किमी अंतरावर आहे. हे पाली शहरालगत असलेल्या चोटिला गावात आहे. जरी लोकांना यापूर्वी हे माहित नव्हते, परंतु आता या महामार्गावर जाणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक ओळखीचे स्थान बनले आहे.

दुचाकी पूजेची कथा काय आहे?

ही गोष्ट 1988 सालची. जेव्हा पाली येथील रहिवासी ओम बन्ना (राजस्थानातील राजपूत कुटुंबातील तरुणांसाठी बन्ना हा शब्द वापरला जातो) त्याच्या बुलेट बाईकवरून जात होता आणि अपघात झाला. त्याचा वाटेतच मृत्यू झाला. अपघातानंतर ही दुचाकी पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आली, पण ही दुचाकी तेथून गायब झाली. ही एक कथा आहे. यानंतर ओम बन्नाचा अपघात झालेल्या ठिकाणी दुचाकी सापडली. त्यानंतर ती पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आली आणि नंतर ही दुचाकी त्याच ठिकाणी परत आली. असे बऱ्याचदा घडले. असे म्हटले जाते की पोलिसांनी दुचाकीला साखळीही बांधली होती, पण तरीही दुचाकी पोलिस स्टेशनमधून गायब झाली. यानंतर हा एक चमत्कार मानला गेला आणि त्याच ठिकाणी ती दुचाकीस्थानापन्न करून ठेवण्यात आली. यानंतर लोकांनी त्याची पूजा करण्यास सुरुवात केली आणि लोकांचा विश्वास वाढत गेला.

लोकांचा आता असा विश्वास झाला आहे की ओम बन्ना व त्याची दुचाकी लोकांचे संरक्षण करतात. दुचाकी पूजेपासूनच त्यांची इच्छा पूर्ण होत आहे. असे म्हणतात की, येथे दुचाकी मंदिर बांधले गेले आहे, तेव्हापासून या परिसरात एकही अपघात झाला नाही. यानंतर अगदी लांबच्या परिसरातील लोकही याठिकाणी दुचाकीची पूजा करण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे, राजस्थानमध्ये आता ओम बन्नाची पूजा, आरती, भजन करणारा एक विशिष्ट गट तयार झाला आहे. (Unique temples in India; Where there was a lot of bullet worship, know the reasons behind it)

इतर बातम्या

5-Door Mahindra Thar चं लाँचिंग कन्फर्म, जाणून घ्या शानदार SUV ची एंट्री कधी होणार?

… तर अंगावर वर्दी ठेवणार नाही, पोलिसांना धमकी देत शिवीगाळ, औरंगाबादेत धक्कादायक प्रकार