‘पश्चिम बंगाल हिंसाचारात हिंदू आणि भाजपचे कार्यकर्ते टार्गेट’, GIAचा अहवाल गृह राज्यमंत्र्यांकडे सुपूर्द

'पश्चिम बंगाल हिंसाचारात हिंदू आणि भाजपचे कार्यकर्ते टार्गेट', GIAचा अहवाल गृह राज्यमंत्र्यांकडे सुपूर्द
West Bengal Violence

पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात हिंदू समाज आणि भाजपचं समर्थन करणाऱ्या किंवा भाजपला मतदान करणाऱ्या महिलांवर अत्याचार करण्यात आल्याचा अहवाल

सागर जोशी

|

May 29, 2021 | 9:59 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला होता. त्यात भाजपच्या अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. या हिंसाचाराबाबत ग्रुप ऑफ इंटेलेक्चुअल्सचा (GIA Report) अहवाल गृह राज्यमंत्र्यांकडून सोपवण्यात आलाय. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात (Post Election Violence in Bengal) हिंदू समाज आणि भाजपचं समर्थन करणाऱ्या किंवा भाजपला मतदान करणाऱ्या महिलांवर अत्याचार करण्यात आला. या अहवालात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि एनआयए अंतर्गत एसआयटी तपासाची शिफारत करण्यात आलीय. (Hindu and BJP activists targeted in West Bengal violence – GIA)

‘खेला इन बंगाल 2021 : शॉकिंग ग्राऊंड स्टोरीज’ (Khela In India: Shocking Ground Stories 2021) या अहवालात नमूद करण्यात आलं आहे की, बंगालमधील हिंसा फक्त राजकीय हिंसेच्या रुपात पाहणं म्हजे हिंदू समाजातील कमकुवत वर्गासोबत झालेल्या अत्याचाराची तीव्रता कमी करणे आहे. यामध्ये ते लोक सहभागी आहेत ज्यांनी भाजपला मतदान केलं होतं.

राजकीय हिंसाचारासाठी सरकारी यंत्रणेचा वापर

निवडणूक जिंकण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी TMC चं हिंसेचं मॉडेल चलनात होतं. राजकीय प्रतिद्वंदी विरोधात हिंसा घडवून आणण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर झाला. अशा प्रकराचे काही पुरावे संपूर्ण हिंसाचाराच्या तपासात मिळाले आहेत, असा दावा या अहवाल करण्यात आलाय. इतकंच नाही. तर महिलांवर बलात्कार करण्यात आला. त्यांना मारहाण झाली. अत्यंत वाईट पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा दावाही अहवालात केला गेलाय. त्याचबरोबर गावठी बॉम्बचा वापर झाला, लोकांची हत्या करण्यात आली. दुकारने आणि रेशन कार्ड लूटण्यात आल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय.

गृह राज्यमंत्र्यांकडे अहवाल सुपूर्द

बंगालमधील हिंसाचारातील पीडित हे मुख्यत्वे हिंदू समाजातील असा वर्ग आहे जो भाजपचा समर्थन किंवा मतदान म्हणवला जातो, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीच्या ग्रुप ऑफ इटेलेक्चुअल्स समूह (GIA)ने हिंसाचार पीडित 20 लोकांचे मत जाणून घेण्यात आले. झूम आणि गुगल मीट यांसारख्या व्यासपीठावरुन किंवा फोनद्वारे पीडितांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर GIA ने आपला अहवाल गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे सोपवला आहे.

संबंधित बातम्या :

भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह फासावर लटकवला, बंगालमधील हिंसाचार शिगेला

बंगालमध्ये पुन्हा राजकीय हिंसाचार, भाजपच्या बड्या नेत्याच्या रॅलीवर जोडे-चप्पल आणि दगडफेक

Hindu and BJP activists targeted in West Bengal violence – GIA

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें