केवळ जेवण देणं नाही, प्रायव्हेट प्लेनच्या एअर होस्टेसची ‘ही’ कामं ऐकून तुम्ही थक्क व्हाल

एअर होस्टेसचे काम फक्त प्रवाशांना सेवा देण्यापुरते मर्यादित नसते, हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, प्रायव्हेट जेटमधील त्यांची काम सामान्य पॅसेंजर फ्लाइटपेक्षा खूप वेगळी आणि अधिक आव्हानात्मक असतात. तर काय काम असतात हे वाचून तूम्हीही थक्क व्हाल.

केवळ जेवण देणं नाही, प्रायव्हेट प्लेनच्या एअर होस्टेसची ही कामं ऐकून तुम्ही थक्क व्हाल
| Edited By: | Updated on: Aug 15, 2025 | 10:24 PM

एअर होस्टेस (Air Hostess) किंवा फ्लाइट अटेंडंट यांचे काम केवळ प्रवाशांना नाश्ता किंवा जेवण देण्यापुरते मर्यादित नाही, तर ते अत्यंत आव्हानात्मक आणि जबाबदारीचे असते. त्यांना प्रवाशांच्या सुरक्षेची आणि सोयी-सुविधांची काळजी घ्यावी लागते. एअर होस्टेसचे काम पाहताना जरी ते सोपे वाटत असले तरी, ते खूप कठीण आहे. दिवस-रात्र, एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास, रागीट प्रवाशांना सामोरे जाणे आणि तांत्रिक बिघाडाच्या धोक्यातही सतत हसतमुख राहणे, हे त्यांच्या कामाचाच एक भाग आहे. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की पॅसेंजर फ्लाइट आणि प्रायव्हेट जेटमधील एअर होस्टेसच्या कामात खूप मोठा फरक असतो?

पॅसेंजर फ्लाइटमध्ये अनेक प्रवासी आणि 4 – 5 एअर होस्टेस असतात. पण प्रायव्हेट जेटमध्ये फक्त जेटचा मालक, त्याचे काही खास पाहुणे आणि दोन पायलट असतात. त्यामुळे, प्रायव्हेट जेटमधील एअर होस्टेसला प्रवाशांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गरजांची वैयक्तिक काळजी घ्यावी लागते.

तर ही असतात प्रायव्हेट जेटमधील एअर होस्टेसचे काम

1. पाळीव प्राण्यांची काळजी: प्रायव्हेट जेटमधील काही श्रीमंत प्रवासी त्यांच्यासोबत पाळीव प्राण्यांनाही घेऊन जातात. अशावेळी एअर होस्टेसला प्रवाशांच्या सोबत त्यांच्या पाळीव प्राण्यांचीही काळजी घ्यावी लागते.

2. पार्टी आणि मनोरंजन: अनेकदा प्रायव्हेट जेटमध्ये पार्ट्या आयोजित केल्या जातात, ज्यात संगीत, नाच आणि महागडी पेये असतात. अशावेळी एअर होस्टेसला प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यासोबतच, कोणताही गैरप्रकार होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. जरी प्रवाशांनी तिला पिण्यासाठी आग्रह केला, तरी ती आपली जबाबदारी विसरत नाही.

3. व्यक्तिमत्त्व ओळखणे: केवळ सेवा देणे पुरेसे नाही. प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करणाऱ्यांच्या आवडी-निवडी आणि त्यांचा मूड समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. प्रवाशांना कोणती गोष्ट कधी लागेल, याचा अंदाज एअर होस्टेसला असावा लागतो.

4. सेवेनंतरची जबाबदारी: प्रवासादरम्यानच्या पार्ट्यांनंतर होणारी अनागोंदी सांभाळण्याची जबाबदारीही एअर होस्टेसवरच असते.

5. पॅसेंजर फ्लाइटच्या तुलनेत प्रायव्हेट जेटमधील एअर होस्टेसचे काम अधिक वैयक्तिक, आव्हानात्मक आणि उच्च दर्जाचे असते.