IMEI नंबरमध्ये कोणती अशी सीक्रेट माहिती असते,ज्यामुळे चोरी झाल्यावर सुद्धा मोबाइलच्या लोकेशन संबधित माहिती कळते..?

IMEI नंबरमध्ये कोणती अशी सीक्रेट माहिती असते,ज्यामुळे चोरी झाल्यावर सुद्धा मोबाइलच्या लोकेशन संबधित माहिती कळते..?
IMEI Number

प्रत्येक मोबाईल मध्ये  15 अंकाचा  IMEI नंबर  दिला जातो, जो त्या मोबाईलची विशिष्ट ओळख दर्शविते. याचे संक्षिप्त रूप International Mobile Equipment Identity. IMEI  नंबर कसे काम करते, याला कसे तयार केले जाते आणि याची विशेषता काय असते? जाणून घेवुया या सर्व प्रश्नांची उत्तरे...

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 04, 2022 | 1:45 PM

मुंबई : प्रत्येक मोबाईलमध्ये  15 अंकाचा  IMEI नंबर  दिला जातो, जो त्या मोबाईलची विशिष्ट ओळख दर्शविते. याचे संक्षिप्त रूप International Mobile Equipment Identity. हा नंबर खूपच  खास असतो कारण की यामध्ये अनेक प्रकारची माहिती लपलेली असते, जसे की मोबाईलचा  मॉडेल कोणता आहे,याचे निर्माण कोठे केले गेले. विना IMEI नंबर वाला फोनचा वापर केला तर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.

एका रिपोर्ट नुसार, देशात सुमारे 2.5 कोटी लोक दीर्घकाळ पासून विना  IMEI नंबर असलेले  मोबाइल फोनचा वापर करत होते. अश्या प्रकारचे मोबाईल 30 नोव्हेंबर  2009 पासून बंद केले गेले. अशातच प्रश्न निर्माण होतो की ,हे  IMEI नंबर कसा बनविला जातो ज्याची एवढी खासियत आहे…

IMEI नंबर कसा काम करतो, याला कसे तयार केले जाते आणि याची खासियत काय आहे ,जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे …

काय करतो हा  IMEI नंबर आणि याचे नेमके फायदे काय आहेत ?

हा विशेष प्रकारचा नंबर आहे ,जो आपल्या मोबाईलचे लोकेशन सांगतो. याच्या मदतीने मोबाईल वापरणारा यूजर कोठे आहे हे ओळखले जाते. आपला मोबाईल फोन हरवल्यानंतर याच नंबरच्या आधारे आपला फोन परत मिळविला जातो. हा नंबर मोबाईल फोनच्या बॅटरीवर लिहिलेला असतो.

हा एक युनिक नंबर आहे,जो प्रत्येक फोनचा वेगवेगळा असतो आता आपण या नंबरचे फायदे सुद्धा जाणून घेणार आहोत. IMEI चा सर्वात जास्त फायदा गुन्हेगारांना पकडण्यासाठी केला जातो याशिवाय कुणाचा फोन चोरी झाल्यावर त्या व्यक्तीचा मोबाईल फोन शोधण्यासाठी तसेच या नंबरच्या आधारे चोराचा शोध देखील घेतला जातो.

अशाप्रकारे जाणून घ्या आपला IMEI नंबर

जर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनचा आयएमईआय नंबर जाणून घ्यायचा असेल तर अशावेळी फोन मधून *#06# नंबर डायल करा.हा नंबर  डायल केल्यानंतर तुमच्या मोबाईल फोनच्या स्क्रीनवर हा नंबर दिसून येईल. या नंबरला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवा. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर या नंबरचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता.

याशिवाय आपल्या मोबाइल फोनच्या सेटिंग मध्ये जाऊन सुद्धा या IMEI नंबर बद्दलची माहिती मिळू शकते. एंड्रॉयड फोनवर IMEI नंबर जाणून घेण्यासाठी आपल्या मोबाईल फोनच्या सेटिंग ऑप्शन मध्ये जा. यानंतर फोन विषयी (अबाउट) हा पर्याय निवडायचा आहे मग IMEI। स्टेटस वर क्लिक करायचे आणि स्क्रीनला खाली स्क्रॉल करून  IMEI ची माहिती प्राप्त करू शकतो.

जर तुमच्याकडे iPhone 5 किंवा अन्य कोणताही iPhone चा लेटेस्ट वर्जन आहे तर  IMEI त्याच्या बॅक पॅनल वर दिसून जाईल. यासाठी फक्त आपल्याला फोनच्या मागे पाहायचे आहे आणि या नंबरला कुठेतरी सुरक्षित जागेवर लिहून ठेवायचे आहे. iPhone 4s आणि याच्या पेक्षा जूने मॉडेल वाले iPhone var IMEI सिम ट्रे वर प्रिंट केलेला असतो.

IMEI नंबर ला कसे तयार केले जाते ?

15 अंक असणारे IMEI नंबर मध्ये अनेक बाबी समाविष्ट असतात ,जसे की सुरुवातीचे 8 अंक आपल्याला हे मॉडेल कोठे बनवले गेले आहे याबद्दलची माहिती सांगता.यानंतरच्या पुढील 6 अंकांमध्ये या मोबाईल फोनच्या डिवाइस बद्दलची माहिती समाविष्ट केली गेलेली असते. आणि शेवटचे क्रमांक मोबाईल मधील सॉफ्टवेअर वर्जन संदर्भातील जी काही महत्त्वाची माहिती असते ती दर्शविते. अशा प्रकारे तयार केला जातो IMEI  नंबर, ज्यामध्ये मोबाईल संबधित जोडली गेलेली अनेक महत्त्वाची माहिती समाविष्ट असते.

हेही वाचा :

नववर्षाला फ्रान्समध्ये का जाळल्या गेल्या 874 गाड्या,या विवादास्पद परंपरा मागील काय आहे नेमके कारण ?

फ्री- वायफायचा वापर करत आहात? तर आधी या धोक्यांना ओळखा, तुमचा डेटा हॅकर्सच्या निशाण्यावर तर नाही ना?

अनेक स्टेशनच्या नावामध्ये सेंट्रलचा वापर केला जातो, माहित आहे का यामागील कारण?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें